Doctor suicidal death esakal
नाशिक

Nashik : पंचवटीत डॉक्टरची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटी चिंचबन परिसरातील डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पती- पत्नीतील कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Suicide of doctor in Panchvati Nashik Latest Marathi News)

नीलेशकुमार पोपटलाल छाजेड (४८, रा. धात्रक संकुल, चिंचबन, मालेगाव स्टॅन्डजवळ, पंचवटी), असे मयत डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. छाजेड हे पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. सोमवारी (ता. ५) सकाळी साडेसात वाजता छाजेड यांनी राहत्या घरात गळफास लावून घेतला.

घटना उघडकीस येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, डॉ. छाजेड यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पंचवटी पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. छाजेड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विधेयक राष्ट्रविरोधी, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न - राहुल गांधींचा हल्लाबोल

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT