Deepak Dive & Vijay Jadhav
Deepak Dive & Vijay Jadhav esakal
नाशिक

Nashik : चौकशीसाठी बोलविलेल्या तरूणाची आत्महत्त्या; विष घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या युवकाने गंगापूर पोलिस ठाण्यात येण्यापूर्वीच विषप्राशन केल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृत युवकाच्या नातलगांनी पोलिसांच्या चौकशीमुळेच त्याने आत्महत्त्या केल्याचा आरोप केला आहे, तर हा युवक पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आलाच नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे. (Suicide of youth who called for police questioning Nashik Latest Marathi News)

विजय शिवाजी जाधव (३२, रा. रामगडिया भवन शेजारी, धात्रक फाटा, जत्रा हॉटेलजवळ, नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ८ तारखेला रात्री गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोदापार्क परिसरात दीपक दिवे व विजय जाधवसह आणखी काही साथीदार बसले होते. त्यावेळी दिवे यास कोणाचा तरी फोन आला म्हणून तो बोलत-बोलतच निघून गेला. त्यानंतर मात्र तो घरी परतला नाही. दोन दिवसांनी १० तारखेला दिवे याच्या पत्नीच्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसात बेपत्ताची नोंद दाखल करण्यात आली आहे.

त्यासाठी गंगापूर पोलिसांनी गोदापार्कवर बेपत्ता दिवेसोबत असलेल्यांची चौकशी सुरू केली. त्यासाठी त्यांनी सर्वांना नातलगांसह चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, रविवारी (ता.१३) सकाळी चौकशीसाठी बोलाविण्यात आलेले काही जण गंगापूर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या चहाच्या टपरीवर जाधव याची प्रतीक्षा करीत थांबले होते. काही वेळाने तो आला असता, त्याने आपण विष प्याल्याचे सांगितले. त्यावेळी तेथे असलेल्यांनी त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

नातलगांचा पोलिसांवर आरोप

विजय जाधव याचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नातलगांनी गर्दी केली. दिवे याच्या बेपत्ता प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून जाधव याचा छळ करण्यात आल्याचा आरोप मृत जाधव याच्या नातलगांनी केला. पोलिसांच्या छळवणुकीमुळे त्याने आत्महत्त्या केल्याचा आरोपही करती याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जाधवचा भाऊ कृष्णा जाधव, विष्णू घार्गे यांनी केली आहे.

पोलिसांनी आरोप फेटाळले

मृत जाधव यास गंगापूर पोलिसांनी दिवे बेपत्ता प्रकरणी चौकशीसाठी दोन दिवसांपासून बोलाविले होते. त्याच्यासोबतच्यांची चौकशी करण्यात आली परंतु मृत जाधव शुक्रवारी व शनिवारी चौकशीसाठी आलाच नाही. रविवारी पुन्हा सर्वांना बोलाविले होते. परंतु जाधव याने पोलिस ठाण्यात येण्यापूर्वीच विषप्राशन केलेले होते. त्यामुळे जाधव याच्या नातलगांनी केलेले आरोप निराधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील नोंद पोलिस ठाण्यात असल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. मृत विजय जाधव याच्याविरोधात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT