female suicide.jpg 
नाशिक

धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव मध्य) शहरातील रौनकाबाद येथील एका महिलेने शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सायराबानो शेख उमर असे मृत महिलेचे नाव असून सविस्तर प्रकार असा की...

अशी आहे घटना

शहरातील रौनकाबाद येथे शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या सुमारास घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली. मनोविकाराने त्रस्त असलेल्या या महिलेस लॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते. सायराबानो शेख उमर असे मृत महिलेचे नाव आहे. सायराबानो हिचे सासर शहरातील नोमानीनगर येथे आहे. तिला मनोविकाराने ग्रासले असल्याने २०१५ पासून तिच्यावर सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तीन-चार महिन्यापासून तिचे औषध संपले होते. परंतु लॉकडाऊनमुळे वाहने बंद होती. खासगी वाहनाने जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने तिला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाही. 

औषधोपचार न मिळाल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. या नैराश्यातून रात्री आठच्या सुमारास माहेरी रौनकाबाद येथे वरच्या मजल्यावर ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तर समोरच सायराबानोचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. अशी माहिती भाऊ मोहम्मद शाकीर याने पोलिसांना दिली. तिच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT