Sula Vineyards
Sula Vineyards Sakal
नाशिक

Sula Vineyards : गत तिमाहीत सुलाला 39 कोटींचा निव्वळ नफा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशातील वाइन व्‍यवसायात पन्नास टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी असलेल्या सुला विनयार्ड्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या त्रैमासिकाचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत ३९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला असून, सर्वोच्च महसूल व करपूर्व नफ्याची नोंद केली आहे. (Sula Vineyards net profit of 39 crore in last quarter nashik news)

अधिक माहिती देताना सुला विनयार्ड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत म्हणाले, की तिसरे त्रैमासिक महसूल आणि नफ्याबाबत विक्रमी ठरले. २०२२-२३ च्या पहिल्या नऊ महिन्यांत, विशेषतः आमच्या स्वतःच्या ब्रँड्स आणि वाइन पर्यटन व्यवसायांमध्ये लक्षणीय वृद्धी झाली आहे.

करपूर्व नफ्यामध्ये ९ महिन्यांच्या कालावधीत ३१ टक्‍के इतका विक्रमी उच्चांक गाठला आहे. वाइन पर्यटन व्यवसाय वाढला असून, पर्यटकांची संख्या कोविडपूर्व काळाच्या पातळीपर्यंत पोचली आहे.

चांगला मॉन्सून आणि त्यानंतर द्राक्ष वाढीसाठीचे पूरक वातावरण यामुळे सलग तिसऱ्या वर्षी, गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्हींमध्ये द्राक्षांचा उत्तम पुरवठा अपेक्षित आहे. नियोजित ६० लाख लिटर नवीन क्षमतेपैकी पहिल्या टप्प्यामध्ये २० लाख लिटरचा वाइन सेलरमध्ये साठवणूक केली जाईल.

२०२२ मध्ये पाचशे एकराहून अधिक वाइन द्राक्ष बागांची विक्रमी नवीन लागवडदेखील झाली असून, बहुतांश काळे द्राक्ष आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या त्रैमासिकात महसूल वार्षिक तुलनेत साडे चौदा टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गुणवत्तापूर्ण वाइन उत्‍पादनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे एलियट आणि प्रीमिअम वाईन्सचे उत्पादन ३४.८ टक्क्यांनी वाढले आहे. तर इकॉनॉमी आणि पॉप्युलर वाईन्सचे उत्पन्न १८.३ टक्क्यांनी वाढले आहे. सुला शिराझ कॅबरने मूल्यानुसार भारताचा क्रमांक एकचा वाइन ब्रँड म्हणून आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

वाइन पर्यटनात वाढ

वाइन पर्यटन क्षेत्रात वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘द सोर्स’ आणि ‘बियॉन्ड बाय सुला’ या दोन्ही रिसॉर्ट्सनी सरासरी ऐंशी टक्‍के रूम बुकिंग नोंदविल्‍याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

गतवर्षी डिसेंबरमध्ये ४५ हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट देताना वाइन पर्यटनाचा आनंद लुटला असून, पर्यटकांची ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मासिक संख्या आहे. टेस्टिंग टीमने देशभरात विक्रमी नव्वद हजाराहून टेस्टिंग आयोजित केल्या असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT