SULA Vineyard esakal
नाशिक

Nashik Sula Vineyards: पहिल्‍या तिमाहीत ‘सुला’ने नोंदविले सर्वोच्च उत्‍पन्न, नफा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Sula Vineyards : सुला विनियार्डस्‌ने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने यात दमदार कामगिरी करताना पहिल्या तिमाहीचे आत्तापर्यंतचे सर्वोच्च उत्पन्न आणि सर्वोच्च नफ्याची नोंद केली आहे. (Sula Vineyards reports highest revenue profit in first 3 months Nashik)

सुलाचे उत्पन्न गेल्या वर्षी याच तिमाहीत ९७ कोटी २० लाख रुपये रुपये होते. त्‍यात २१.६ टक्‍के वाढ होऊन ११८ कोटी दहा लाख रुपये उत्‍पन्न झाले आहे. वाइन विक्री ७८.३ कोटींवरून २९.८ टक्‍के वाढ नोंदवत १०१.७ कोटी रुपये झाली आहे.

वाइन पर्यटन व्यवसाय १२.३ टक्‍के वाढीसह १०.३ कोटीवरून ११.५ कोटी झाला आहे. करपूर्व उत्पन्नात २२.२ टक्‍के वाढ झाली असून, २६.१ कोटीवरून ३१.९ कोटी झाले आहे. नफ्यात २४.४ टक्‍के वाढ झाली असून, ११ कोटीवरून १३.७ कोटी रुपये नफ्याची नोंद झाली आहे.

‘सुला’चे संस्‍थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत म्हणाले, की २०२३-२४ ची सुरवात चांगली झाली असून, कंपनीने पहिल्या तिमाहीचे आत्तापर्यंतचे सर्वोच्च निकाल नोंदविले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आमचे लक्ष्य नेहमी उच्च दर्जाची वाइन बनविणे हेच असून, याच मेहनतीचे परिणाम आहेत. एलिट आणि प्रीमियम वाइनच्या विक्रीत ३५ टक्‍यांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. वाइन पर्यटनानेदेखील दोनआकडी वाढ नोंदविली आहे.

विशेषतः टेस्टिंगच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समाधानी आहे. आमच्या टीमने वायनरीमध्ये आणि देशभरात केलेल्या टेस्टिंग संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

नाशिकच्या रिसॉर्ट्समध्ये आता शंभराहून अधिक रूम आहेत. रूमच्या संख्येत वाढ झाल्यामुळे येत्या काही वर्षांत वाइन टुरिझम व्यवसायात आणखी वृद्धी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT