Summer heat wave
Summer heat wave esakal
नाशिक

Summer Heat : पर्वत रांगा अन्‌ थंड हवेच्या तालुक्यातही उष्णतेची लाट! तापमानाने ओलांडली चाळिशी

सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : चहूबाजूने पर्वतीय रांगा, तसेच दाट झाडी असलेल्या जंगलांचा वनप्रदेश आणि सर्वाधिक धरणे असलेल्या थंडहवेच्या इगतपुरीतही सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवू लागली आहे.

सकाळी आठपासूनच उन्हाचा कडाका जाणवत असून, दुपारी अकरा ते तीन या वेळेत तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहात असल्याने जीवाची काहिली होत आहे. (Summer Heat Heat wave in mountain range and cold weather spot district temperature crossed forty nashik news)

सूर्य जणू आग ओकत असल्यासारखी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तापमानापासून बचावासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत.

पर्वतीय भागासाठी तापमान जेवहा ४० डिग्रीपेक्षा जास्त होते, तेव्हा उष्णतेची लाट येवू पाहते असे संकेत आहेत. मागील आठवड्यात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस असलेल्या तापमानात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड वाढ झाली असून, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातही तापमानाने चाळिशी ओलांडली आहे.

मागील काही वर्षांपासून जागतिक तापमानात प्रचंड वाढ होत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याचे प्रमुख कारण असले, तरी इगतपुरी तालुका यास अपवाद आहे. वनराई अन्‌ दाट जंगलांसह वृक्ष लागवड वाढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुळातच पर्वतरांगा अन्‌ वनप्रदेश लाभल्याने इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे पूर्वीपासूनच निर्मळ थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाच्या झळा प्रचंड जाणवू लागल्या आहेत.

तापमानाचा वाढता आलेख

२०२० : ३५.९

२०२१ : ३७.१

२०२२ : ३९.४

२०२३ : ४०.८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT