Onion in kasmade pattaya Deteriorating onion in chali. esakal
नाशिक

Summer Onion Crisis : उन्हाळी कांदा टिकविण्याचे बळिराजापुढे आव्हान! अवकाळी पावसामुळे कांदा सडतोय

सकाळ वृत्तसेवा

Summer Onion Crisis : यावर्षीचा उन्हाळी कांदा चाळीत टाकावा की तत्काळ विकावा अशी वेळ काही शेतकऱ्यांची झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतात बुरशी झाल्याने कांद्याची मूळकूज झाली आहे. पर्यायाने मुळाच्या बुंदीलाही बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने काही ठिकाणी कांदा खराब होऊ लागला आहे.

त्यामुळे यावर्षी कांदा चाळीत कसा टिकवावा हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना सतावित आहे. काही कांदा चाळींमध्ये तर काही शेतातच खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

चाळीतील चांगला कांदा खराब होऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कांदाविक्री करावी लागत आहे. (Summer Onion Crisis challenge for Baliraja to preserve summer onion Onion rotting due to unseasonal rain nashik news)

कसमादे भागात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मागील काही वर्षी चाळीतील कांदा असाच फेकावा लागला होता. परंतु तशी स्थिती चार-पाच महिन्यांनंतर आली होती. यावर्षी कांद्याला भाव राहील या आशेने शेतकरी कांदाचाळीत कांदा साठवत आहेत.

परंतु बेमोसमी पावसाचा फटका बसलेला कांदा आता चाळीत खराब होण्यास सुरवात झाली आहे. काही कांद्याच्या बुंदीजवळ खराब होऊ लागल्याचे आढळून येत आहे. बाहेरून कांदा चांगला असला तरी आतून तो सडू लागला आहे. यामुळे चाळीत कांदा साठवावा की बाहेरच ठेवत थोडा भाव वाढल्यावर विक्री करावा अशी दुहेरी मनःस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

कांद्याचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु चाळीतील कांदा खराब होण्याच्या शक्यतेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चाळींवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली आहे. यामुळे कांद्याची प्रतवारी करून खराब कांदा बाजूला काढण्यात येत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सध्या उन्हाळ कांद्याचे बाजारभाव सरासरी प्रतिक्विंटल सातशे रुपयांच्या जवळपास आहेत. यामुळे कांदा विकण्याची मनःस्थिती नसली तरी आर्थिक गरजा भागविण्यासाठी आणि कांद्याची टिकवण क्षमताचा अंदाज घेत कांदा विक्री केली जात आहे. यावर्षी ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व गारपिटीने कांदा पीक तोट्यात आणले आहे.

"उन्हाळ कांदा लागवडीपासून, काढणी साठवणूक यासाठी मोठा खर्च केला. यावर्षी तशी उत्पादनात घटच आली. अवकाळी पावसामुळे कांदा भिजला. त्यात बाजारभावाने आर्थिक गणित बिघडवले. साठवलेला कांदा खराब तर होणार नाही ना ही चिंता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची टिकवण क्षमता बघून विक्रीचे नियोजन करावे."

- भगवान जाधव, जिल्हा समन्वयक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT