Onion esakal
नाशिक

Nashik : उन्हाळ कांद्याचा बाजारभाव कमाल 1700, तर सरासरी 1200 रुपये

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : गत सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक टिकून राहिली. मात्र बाजारभावात सुधारणा झाली. या सप्ताहात दरात थोडीशी सुधारणा होऊन कमाल १७०० रुपये, तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. (Summer onion has a maximum market price of Rs 1700 an average of Rs 1200 Nashik News)

उन्हाळा कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. कांदा आवक ४३ हजार ९३३ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव २५० ते १७००, तर सरासरी १२०० रुपये प्रतिक्विटल होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे उन्हाळ कांद्याची आवक २३ हजार ५५८ क्विटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव २०० ते १६०० तर सरासरी ११५० रुपये प्रतिक्विटल होते. दरात सुधारणा होत असली तरी अजूनही वाढ होण्याची प्रतीक्षा असून हा दरदेखील परवडणारा नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे बाजारात आवक स्थिर आहेत

सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली. बाजारभाव स्थिर राहिले. गव्हास व्यापारी वर्ग व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव एक हजार ७९९ ते दोन हजार ४५० रुपये तर सरासरी २१०० रुपयांपर्यंत होते. बाजरीच्या आवकेत घट झाली. बाजारभाव १९२५ ते २३४० तर सरासरी १९७५ रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची आवक टिकून होती. बाजारभाव ३५०० ते कमाल ५५०० तर सरासरी ४३५१ रुपये

प्रतिक्विटल होते. सोयाबीनच्या आवकेत घट झाली. स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. बाजारभाव प्रतिक्विटलला ४४०० ते ६५७५, तर सरासरी ६३८० रुपयांपर्यंत होते. मकाच्या आवकेत घट झाली, तर व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. मक्याची आवक ९२ क्विटल झाली असून, बाजारभाव २००० ते २३३० तर सरासरी २२५० रुपये प्रतिक्विटल पर्यंत होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT