Summer onion prices fall due to arrival of red onion esakal
नाशिक

Nashik Onion News: लाल कांद्याच्या आवकमुळे उन्हाळ कांदा भावात घसरण

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात गुरुवारी (ता. २३) एक हजार १६१ वाहनांमधून २१ हजार ३९५ क्विंटल उन्हाळ व लाल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याची आवक वाढल्याने उन्हाळ कांद्याच्या दरात सरासरी ४०० ते ५०० रुपये क्विंटलला घसरण झाली.

उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याला अधिकचा भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला कमाल तीन हजार ३०० ते तीन हजार ५३५ आणि सरासरी दोन हजार ७०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला.

लाल कांदा कमाल चार हजार १०० व सरासरी तीन हजार ६०० रुपये क्विंटल या भावाने विकला गेला. बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार, उपसभापती युवराज पवार, सचिव संतोष गायकवाड यांनी ही माहिती दिली. (Summer onion prices fall due to arrival of red onion at nampur Nashik)

दिवाळीच्या १५ दिवसांच्या सुटीनंतर कांदा बाजार सुरू झाल्याने लाल कांद्याची बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. उन्हाळ कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आगामी काळात लाल कांद्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.

यंदा मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात पावसाची अवकृपा असल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. पावसाअभावी लाल कांद्याची आवक उशिराने होत असली, तरी चांगल्या भावाने लाल कांद्याची ‘चमक’ वाढली आहे.

यंदा रोगट हवामानामुळे कांद्याचे आयुष्य कमी झाल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब झाला. मार्चमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नव्हता. कांद्याच्या भावात दोलायमान स्थिती असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करीत असल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नामपूरला कांद्याच्या ७४८, तर करंजाडला ४१३ वाहनांची आवक झाली. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे नळकस रस्त्यालगत वाहतूक विस्कळीत झाली.

सकाळी दहाला लिलावाला सुरवात झाली. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यावर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख ‘पेमेंट’ घ्यावे, शेतकऱ्यांनी वाहन पार्किंग करताना बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे गायकवाड व अरुण अहिरे यांनी सांगितले.

दरम्यान, कांद्याबरोबरच मका आणि डाळिंबाची बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मक्याला क्विंटला कमाल दोन हजार १२६, तर सरासरी एक हजार ९०० रुपये भाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT