Onion esakal
नाशिक

Nashik Onion Rates: उन्हाळ कांद्याच्या दरात 410 रुपयांची घसरण

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : उन्हाळ कांद्याची प्रतवारी आणि गुणवत्ता घसरल्याने दरात मंगळवार (ता. २१)च्या तुलनेत बुधवारी (ता. २२) ४१० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मंगळवारी कमाल ३८४७ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झालेला कांदा बुधवारी कमाल ३४३७ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाला, तर तेच हाल लाल कांद्याबाबतही पाहायला मिळाले. लाल कांदा ३४७ रुपये प्रतिक्विंटलने घसरल्याचे दिसून आले. (Summer Onion Rates fall by Rs 410 nashik)

केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतला.

ग्राहक व्यवहार मंत्रालय, नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून २ लाख टन कांदा किरकोळ बाजारात पाठविण्यास सुरवात झाली आहे.

हा कांदा २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दरात विक्री मोठ्या शहरात सुरू झाली आहे. येथील कृषी उतपन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी २००० रुपये, सरसरी ३२००, तर जास्तीत जास्त ३८४७ रुपये भाव मिळाले. लाल कांद्याला कमीत कमी २,७५२ रुपये ,सरसरी ४२००, तर जास्तीत जास्त ४,६५७ रुपये भाव मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT