Highest Temperature Record in Maharashtra esakal
नाशिक

Highest Temperature : मालेगावी हंगामातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा 43.8 अंशावर

सकाळ वृत्तसेवा

Highest Temperature Record: शहर व परिसरावर गुरुवारी (ता.११) सुर्यनारायणाचा प्रकोप जाणवला. सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत होता. येथील तापमानाचा पारा या हंगामातील सर्वात उच्चांकी नोंदविला गेला.

शहरातील तापमान ४३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यातच आज लग्नतिथी असल्याने याठिकाणी हजेरी लावताना उन्हाचा पारा व घामाच्या धारांनी नागरिक, वऱ्हाडी मंडळी हैराण होत आहे. (Summer Temperature Malegavi recorded the highest temperature of season Mercury at above 43 degrees nashik news)

ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस, वारा यामुळे काही काळ तापमान घसरल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला होता. गेल्या आठवड्यापासून तापमान हळूहळू वाढू लागले होते. आज उन्हाचा कहर झाला.

उन्हाच्या झळांमुळे रस्त्यांवर फिरणे मुश्‍कील झाले होते. दुपारी प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता. महत्त्वाची कामे व लग्न समारंभासाठी मालेगावकर घराबाहेर पडताना दिसले. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे अनेकाजण घरात बसणे पसंद करत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर काहींनी बाहेर जाण्यासाठी चारचाकीचा आधार घेत आहे. ग्रामीण भागातही तापमान वाढले असल्याने शेती कामे ठप्प होती. शेतातील महत्त्वाची कामे सकाळी उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता.

सकाळी अकरापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. प्रत्येकाला टोपी, उपरणे, गॉगल आदींचा आधार घ्यावा लागला. वाढत्या तापमानामुळे एकूण कामकाज व येथील जनजीवनावरही परिणाम झाला. शीतपेय व्यावसायिक मात्र वाढत्या तापमानामुळे दिलासा मिळत आहे. सायंकाळी रस्त्यावर वर्दळ जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT