Ration Shop esakal
नाशिक

Nashik News : स्वस्त धान्य दुकानाचे जाहीरनामे; अर्ज करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यात बंद पडलेली रेशन दुकाने नव्याने सुरू करण्यासाठी नवीन परवाने देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे.

यासाठी इच्छुकांकडून ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यांना रेशन दुकानाचा परवाना हवा आहे त्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी केले आहे. ( supply department decided to issue new licenses to reopen closed ration shops nashik news)

सुरगाणा धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेली दुकाने बंद पडली होती, तर काही दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला होता, तर काही दुकानांवर कारवाई झाल्याने ती दुकाने बंद करण्यात आली होती.

ही दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी आता प्रशासनाने प्रकिया सुरू केली असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याकरिता असलेल्या विविध अटी व शर्तीसह जाहीरनामा धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठिकाणी होणार नवीन दुकान कार्यान्वित

करंजूल (क), पांगारणे, खोबळा (मा), उंबरठाण २, मोहपाडा (चि), भेनशेत, खोबळा(दि), हतगड, कोठुळा, घोडी, आंबुपाडा (बे), सुंदरबन, उंबरदे (मा), गडगा, कहांडोळपाडा, सतखांब, अळीवदांड, चिराई, मुरुमदरी, सूर्यगड, भाटी, आमझर, पायरपाडा (प), खांदुर्डी, राहुडे या ठिकाणी नव्याने परवाने देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे संकेतस्थळ https://nashik.gov.in वर सविस्तर माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT