Satyajeet Tambe esakal
नाशिक

Satyajeet Tambe News : काँग्रेसमधील साथीदार सत्यजित यांच्याच पाठीशी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून ट्विस्ट निर्माण झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले खरे, मात्र सध्या त्यांच्या प्रचारात काँग्रेसचे कार्यकर्तेच सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

काहींचा खुलेआम, तर काहींचा पडद्याआडून पाठिंबा मिळत असून, डॉ. तांबे यांनी गेल्या पंधरा वर्षांत केलेली कामे, सत्यजित यांची प्रतिमा यामुळे हे घडत असल्याचे काँग्रेसचेच लोक खासगीत सांगत आहेत.

यामुळे महाविकास आघाडीचे नेते गोंधळात सापडल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे आज पीएच.डी.धारकांसह विविध संघटनांनी सत्यजित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. (Support of Satyajit partner in Congress Many hidden while many openly active support of various organizations has also been announced Nashik News)

काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांना निलंबित केले असले तरी शिक्षक व पदवीधरांशी संबंधित असलेल्या संघटनांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

त्यामुळे तांबे यांचे बळ दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे पाच जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे तांबे यांना ज्या पक्षातून निलंबित करण्यात आले त्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सत्यजित तांबे यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे काही कार्यकर्ते खुलेआम, तर काही पडद्यामागून त्यांचा प्रचार करत आहे. यावरून पक्षाच्या वरिष्ठांनी तांबे यांना निलंबित केले असले तरी कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना मनापासून स्वीकारले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रचारासाठी खुलेआम मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

माणसे जोडल्याचा परिणाम

मागील तेरा वर्षांत डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करताना पक्षविरहित माणसे जोडली. मनमिळाऊ व साधा स्वभाव, प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याची वृत्ती व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गावोगावी जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम डॉक्टर तांबे यांनी केले.

विभागातील पाचही जिल्हे त्यांनी पिंजून काढले. त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणाच्या पलीकडे जाऊन डॉ. तांबे यांनी उमेदवारी दिलेल्या सत्यजित यांच्या पाठीशी कार्यकर्ते उभे राहिल्याचे दिसून येत आहे. पदवीधारांशी थेट मोबाईलद्वारे संपर्क साधताना सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सत्यजित यांचा प्रचार केला जात आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

न्याय देण्याचा प्रयत्न ः सत्यजित तांबे

मतदारसंघात आज पीडीएफसह विविध संघटनांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला. पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करताना तांबे यांनी न्याय देण्याचे काम ताकदीने करेल, असे आश्वासन दिले. ‘शिक्षकांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या टीडीएफ संघटनेने पुण्यात बैठक घेऊन सत्यजित तांबे यांच्यामागे संघटनेने ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

संयुक्तपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पीडीएफबरोबरच कनिष्ठ विद्यालय शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर संघटना, एनडीएसटी सोसायटी आदींनी तांबे यांना पाठिंबा दिला. एनडीएसटी सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, टीडीएफचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्यवाह हिरालाल पगडाल, नाशिकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष एस. के. शिंदे, बाळासाहेब ढोबळे, अरुण पवार, मोहन चकोर, माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह चंद्रकांत कुशारे, शिक्षकेतर संघटनेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरसाठ, दीपक व्याळीज, निंबा कापडणीस, संजय देसले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT