Farmers in the agricultural suburbs protested against the electricity problems in the sub-centre at ajmer saundane esaka
नाशिक

Nashik News : वीजप्रश्‍नी सुराणे ग्रामस्थांचा उपकेंद्रात ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : सुराणे (ता. बागलाण) येथील शेतीशिवारात वीजेच्या समस्या महावितरण कंपनीकडून सुटत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन अजमेर सौंदाणे येथील उपकेंद्राच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन छेडले. तसेच, शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या शासन व महावितरण कंपनीविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले. (Surane villagers facing power problems agitation at sub centre Nashik Latest Marathi News)

शेतीशिवारात पिकांना पाणी देण्याची गरज असतांनाच महावितरण कंपनीकडून खोडसाळपणा सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. सुराणे परिसरात कांदा, डाळिंब आदि पिकांसाठी शेतकरी पाणी देण्यासाठी जीवाची घालमेल करीत असून, महावितरण कंपनीकडून फक्त दिवसा आठ तास वीजपुरवठा करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चार तास होणारा वीजपुरवठाही सुरळीत दिला जात नाही. पिकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तर देऊ वेळ मारून नेली जाते.

गेल्या तीन वर्षांपासून या परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याबाबत समस्या निर्माण झाल्या असतांनाही ‘आम्हाला कोणी वालीच नाही’ अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे. शेतीपिंकाचे मोठे नुकसान होत असल्याने महावितरण कंपनीविरोधात संतापाची लाट उसळली असून, अखेरीस शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन महावितरण कंपनीच्या अजमेर सौंदाणे उपकेंद्रात धडक देऊन ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. या वेळी आंदोलनाची भनक लागताच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

अखेरीस महावितरण कंपनीकडून मंगळवारी (ता. १३) बैठक घेऊन गुरूवार (ता. १५) पासून आठ तास सुरळीत वीजपुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले. मात्र, गुरुवारपर्यंत वीजेच्या समस्यांबाबत निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

गुजरात राज्यात समावेशाचा देणार प्रस्ताव

आम्ही मागील तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा करत आहोत. परंतु, आम्हाला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. आम्हाला नवीन सबस्टेशन येईपर्यंत काहीच करता येणार नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, सुराणे गावचा गुजरात राज्यात समावेश करून घ्यावा, असा ठराव तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

"परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. संपूर्ण ऑक्टोबर महिना अतिवृष्टी झाली. परंतु, शेतकऱ्यांना ना पिकविमा मिळाला ना नुकसान भरपाई. लोकप्रतिनिधी साधे फिरकले देखील नाही. तलाठी व कृषी सहाय्यक पाहणी करून निघून गेले. शेतकरी कांदा लागवड करत आहे. परंतु, आम्हाला दिवसा फक्त चार तास वीजपुरवठा मिळतो." - दीपक ठोके, शेतकरी, सुराणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT