surekha rokade
surekha rokade esakal
नाशिक

जिद्द : मंडप व्यवसायातून कुटुंबासाठी उभ्या राहिल्या सुरेखाताई

विजयकुमार इंगळे

कुटुंबाच्या जडणघडणीत आयुष्यात आलेल्या गरिबीतूनही मुलांसाठी भक्कम आधार होत, तिचं कुटुंब परिस्थितीशी झगडत होतं. भूमिहीन असलेल्या कुटुंबातूनही दुसऱ्याकडे मजुरी करत जमलेल्या तुटपुंज्या पुंजीतून मंडप व्यवसाय सुरू केला.

कुटुंबाची वाट भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच नियतीनं पतीचं छत्र हिरावून नेलं. अशाही परिस्थितीत मुलांसाठी आधार बनत मंडप व्यवसायातून कुटुंबाला सावरत खचलेल्या महिलांसाठी आधार बनल्यात, त्या लोणवाडी (ता. निफाड) येथील सुरेखाताई रोकडे. (Surekhatai Rokade stood up for her family from mandap business success story nashik Latest Marathi News)

खानदेशातील चाळीसगाव तालुक्यातील तळवाडे येथील छोटूलाल व बेबीबाई पवार यांना चार मुली आणि मुलगा. पवार दांपत्याच्या सुरेखाताई ज्येष्ठ कन्या. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेखाताई घरात मोठ्या.

सुरेखाताईंचे शिक्षण बारावीपर्यंत. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना वडिलांनी २ हजारमध्ये विवाहाची जबाबदारी पार पाडल्याने सुरेखाताईंना पुढे शिकता आले नाही.

निफाड तालुक्यातील नारायणटेंभी येथील विठ्ठल काशीनाथ रोकडे यांच्याशी सुरेखाताईंचा विवाह झाला. पती विठ्ठल रोकडे यांचेही शिक्षण जेमतेम दहावी. सासरीही परिस्थिती जेमतेमच. मोलमजुरीशिवाय पर्याय नसलेल्या रोकडे कुटुंबातील सदस्यसंख्याही मोठी. विठ्ठल रोकडे घरातील कर्ते. मात्र चारही भावंडांना मजुरीसाठी बाहेर जावे लागत होते.

गाव सुटले

परिस्थितीने खचून गेलेल्या कुटुंबाला दोन वेळच्या भाकरीसाठी न चुकता इतरांच्या शेतावर जावे लागत होते. यातच काहीतरी चांगले व्हावे, यासाठी सुरेखाताई पतीसह जवळच असलेल्या लोणवाडी या गावी मजुरीसाठी स्थलांतरित झाल्या.

समोर अंधार... परिस्थिती सुधारेल, याची सुतरामही शक्यता नसताना पतीला खचून न जाऊ देता आधार देत सुरेखाताई आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जात होत्या. यातच मुलगा हर्षल आणि मुलगी सुनीता यांच्यामुळे कुटुंब चौकोनी बनले.

आयुष्यात वाटेला आलेलं दारिद्रय पाठ सोडत नाही, याची सुरेखाताईंना जाणीव असल्याने त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.

व्यवसायाची वाट मिळाली

लोणवाडी आणि पंचक्रोशीतील मंडप आणि सामग्रीची गरज ओळखून मजुरीतून मिळालेल्या पैशांतून मंडपाचे साहित्य खरेदी केले.

येथूनच खऱ्या अर्थाने कुटुंबाच्या प्रगतीला सुरवात झाली. पती विठ्ठल रोकडे मंडप व्यवसायाकडे लक्ष पुरवत असताना सुरेखाताईंनीही याच जोडीला गाव आणि परिसरात लहान- लहान कार्यक्रमांसाठी केटरिंगची कामे घेण्यास सुरवात केली.

कुटुंबाला अनेकदा खचून जाण्याचे प्रसंग आलेले असताना सुरेखाताईंनी पतीच्या मागे भक्कम उभे राहत पाठबळ दिले.

आधार कोसळला

रोकडे कुटुंबाला आर्थिक आधार देतान असतानाच मुलांच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. मंडप आणि केटरिंग व्यवसायामुळे कुटुंब सावरत असतानाच पतीच्या अकाली निधनाने मात्र कुटुंबावर नियतीनं पुन्हा दुःख दिलं.

पतीच्या अकाली जाण्याने मुलांचा आधार होणे गरजेचे असल्याने त्यांनी कुटुंबाचा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वतःकडे घेतली. या काळात माहेरच्या मंडळींसह रोकडे कुटुंबातील सदस्यांनी दिलेला आधार खूप मोलाचा असल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

संकटातून बाहेर पडल्या

विठ्ठल रोकडे यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढताना केटरिंग व्यवसायासोबतच मंडप व्यवसायाला पुढे नेण्यासाठी त्यांनी कंबर कसली. एखाद्या महिलेने मंडप व्यवसायाला पुढे नेत तो यशस्वी करून दाखवताना मिळवलेल्या यशाच्या सुरेखाताई मानकरी ठरल्या आहेत.

कुटुंबावर आलेल्या संकटातून स्वतःला सावरतानाच मुलगा हर्षल आणि मुलगी सुनीता यांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवत असतानाच हर्षलचीही सुरेखाताईंना मदत होत आहे. हर्षल सध्या बारावीत असून, मुलगी तमिळनाडू येथे एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत आहे.

मुलाने व्यवसायात पुढे यावे

सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकऱ्या मिळणे कठीण असल्याने मुलाने इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करत आईने पुढे नेलेला व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत पुढे न्यावे, असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

कुटुंबावर कधी कोणती परिस्थिती उदभवेल, हे कोणीही सांगू शकत नाही. काळाची पावले ओळखून महिलांनी स्वतःला सिद्ध करतानाच कुटुंबाचा आधार होताना व्यवसायाकडे वळावे. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

मात्र त्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी, हेच सुरेखाताईंनी पतीच्या निधनानंतर उभ्या केलेल्या व्यवसायातून सिद्ध करून दाखवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT