Dada Bhuse Latest Marathi News esakal
नाशिक

Nashik : दादा भुसे यांची शिवभोजन केंद्राला Surprise visit

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवभोजन केंद्रातील दर्जावरून होणाऱ्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. ११) सरप्राइज व्हिजिट करीत भोजनाची चव चाखली, तेथील रेकॉर्ड आणि दर्जाबाबत नाराजी व्यक्त करीत भाजीचा दर्जा सुधारण्याच्या सूचना दिल्या.

श्री. भुसे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर मुंबई नाका भागातील शिवभोजन केंद्राला सरप्राइज व्हिजिट दिली. (Surprise visit to Shiv Bhojan Center by Dada Bhuse Guardian minister is upset to taste of vegetables Nashik News)

नोंदीच नाही

पालकमंत्री भुसे शिवभोजन थाळी घ्यायला आले. हे पाहिल्यावर केंद्रावर एकच धावपळ उडाली, श्री. भुसे यांनी भोजनाची चव चाखली. तसेच दिवसात केंद्रावर किती जणांनी भेटी दिल्या, याची माहिती घेतली.

केंद्रावर सकाळपासून ५० जणांनी भेटी दिल्या; पण त्याची कुठलीही माहिती व नोंदी नसल्याचे आढळल्यावर त्याविषयी नाराजी व्यक्त केली. केंद्रावर भेटी देऊन शिवभोजन घेणाऱ्या प्रत्येकाच्या आधार क्रमांकासह नोंदी ठेवण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी दिल्या.

"केंद्राबाबत सार्वत्रिक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत भेट दिली. त्यात शिवभोजन घेतलेल्या पन्नास जणांच्या नोंदीच केलेल्या नसल्याचे आढळले. तसेच, भाजीच्या चवीविषयी नाराज असून, त्यांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या."

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT