In a survey of critical illness Avoid giving information from citizens in nashik 
नाशिक

 कोरोनामुक्त नाशिकच्या अभियानात खोडा! गंभीर आजाराबाबतच्या सर्वेक्षणात माहिती देण्यास होतेय टाळाटाळ

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाशी लढा द्यायचा असेल, तर घरोघरी जाऊन गंभीर आजारांचे रुग्ण शोधून त्यांच्यावरही उपचार करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने घरोघरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यास सुरवात केली आहे. परंतु नागरिकांकडून आजारासंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने कोरोनामुक्त नाशिकच्या अभियानाला नागरिकांकडूनच खोडा घातला जात आहे. यासंदर्भात आता नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जून, जुलै व ऑगस्टमध्ये रोजचे आकडे विक्रम मोडीत काढत आहेत. त्यामुळे महापालिकेने मोठी यंत्रणा उभी केली आहे. कोविड सेंटर उभारणे, अडीच लाख अर्सेनिक गोळ्यांचे वाटप, खासगी डॉक्टरांची मदत, प्रभागनिहाय मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन, नवीन वैद्यकीय पदांची भरती, ऑक्सिजन बेडची निर्मिती आदी उपाययोजना राबविताना नगरसेवकही महापालिकेच्या मदतीला धावून आले आहेत. 
नगरसेवकांनी चौदा दिवसांपासून राबविलेल्या मोहिमेत तब्बल तीन हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढताना त्यांच्यावर उपचार सुरू केले. महापालिकच्या वैद्यकीय पथक, शिक्षकांच्या मदतीने कोमॉर्बिड म्हणजेच गंभीर आजाराचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. 

गंभीर आजारांच्या रुग्णांना आहे धोका

गंभीर आजारांच्या रुग्णांना कोरोना संसर्ग होण्यापूर्वीच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी व महापालिकेकडे गंभीर आजारांच्या रुग्णांचा डाटा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण करण्यात आले. परंतु सर्वेक्षणानंतर संबंधित नागरिकांनी आजारांची माहिती देणे अपेक्षित असताना प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनामुक्त नाशिकच्या मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. 

१५ हजार १३४ कुटुंबांची तपासणी 

कोमॉर्बिड रुग्णांच्या तपासणी मोहिमेंतर्गत शहरतील सर्व घरांची व नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १५ हजार १३४ कुटुंबातील ४८ हजार ९२५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संभाव्य धोका लक्षात घेता त्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्‍यक असल्याने सर्वेक्षण अहवालानुसार कोमॉर्बिड रुग्णांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला.
 परंतु त्यापैकी अवघ्या तीन हजार ४२९ नागरिकांनी माहिती दिल्याने जनजागृती करण्याच्या सूचना आयुक्त गमे यांनी दिल्या.

रिपोर्ट - विक्रांत मते 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT