Jailed esakal
नाशिक

Nashik ISIS Connection: इसिसला ‘फंडिंग’प्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी; सिरियातील महिलेला पैसे दिल्याचे पुरावे न्यायालयास सादर

यावेळी एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) न्यायालयासमोर सीरियातील महिलेला पैसे पाठविल्याचे पुरावे सादर केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कुख्यात दहशतवादी संघटना ‘इसिस’ला दुबईमार्गे हवाल्यातून फंडिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित हुसैफ अब्दुल अजिज शेख यास विशेष सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

यावेळी एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) न्यायालयासमोर सीरियातील महिलेला पैसे पाठविल्याचे पुरावे सादर केले. (Suspect remanded in judicial custody in funding case to ISIS Evidence of payment to Syrian woman submitted to court nashik crime)

तिडके कॉलनीतून गेल्या २२ जानेवारी रोजी एटीएसने संशयित हुसैफ अब्दुल अजीज शेख (३०, रा. एमराल्ड रेसिडेन्सी, बाजीराव नगर, तिडके कॉलनी, नाशिक) यास अटक केली होती.

हुसैफ यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने एटीएसने त्यास आज (ता.५) विशेष न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी सरकार पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी संशयिताच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.

तसेच, तपासाच्या दृष्टीकोनातून गरज भासल्यास सरकार पक्षातर्फे संशयिताच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी केली जाईल असा युक्तिवाद केला.

त्यानुसार विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. श्रीमती मृदुला भाटिया यांनी संशयित हुसैफ यास येत्या २० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संशयितांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

राबिया सीरियाच्या कारागृहात

दरम्यान, यावेळी संशयिताने दुबईमार्गे हवालाच्या माध्यमातून इसीसच्या युद्धात मयत झालेल्यांच्या कुटूंबियांना पैसे पाठविल्याचे पुरावे एटीएसने न्यायालयासमोर मांडले.

गेल्यावेळी त्यावरूनच न्यायालयाने एटीएसवर ताशेरे ओढले होते. तसेच, सदरची फंडिंग ज्या राबिया नामक महिलेच्या सांगण्यावरून संशयिताने केले, ती सीरियाच्या कारागृहात असल्याचा दावाही एटीएसने न्यायालयासमोर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT