crime
crime esakal
नाशिक

Nashik News : पेट्रोलपंप लुटीतील संशयित 4 तासात पोलिसांकडून जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक: औरंगाबाद मार्गावरील ओढा परिसरातील शिवसरस्वती पेट्रोलपंपावर मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघा संशयितांनी बाटलीत पेट्रोल (Petrol) घेण्याचे बहाण्याने कामगाराला मारहाण करीत,

१ लाख ४२ हजाराची रोकड पळवून नेली होती. (Suspects in petrol pump robbery arrested by police within 4 hours nashik news)

या प्रकरणाचा तपास करताना आडगाव पोलिसांनी चार तासात संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

अभिजित गणपत ढिकले, (२५, रा. सय्यद पिंप्री) अनिकेत बाळासाहेब रसाळ (२०, रा. बोधलेनगर) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर गावाजवळून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून १ लाख ४२ हजाराची रोकड तसेच काळ्या रंगाची दुचाकी, असा २,१७,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

याप्रकरणी शिवसरस्वती पेट्रोलपंपावरील कर्मचारी सचिन शरद गोडसे (१९, रा. माडसांगवी) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ओढा गावातून ताब्यात घेण्यात आले .

अवघ्या चार तासात उघडकीस आणण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांच्यासह सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, अरुण पाटील, सुभाष जाधव, बी. एस. वाळवणे, टी. के. गायकवाड आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT