Suspects in the shooting case drawn up. esakal
नाशिक

Nashik Crime News : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील संशयितांची परिसरातून धिंड

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : फुलेनगर परिसरातील गोळीबार प्रकरणातील संशयितांची मंगळवारी (ता.२१) पोलिसांनी फुलेनगर परिसरातून धिंड काढली. परिसरातील नागरिकांच्या मनातील दहशत कमी व्हावी या उद्देशाने पोलिसांनी तिघा संशयितांची घटना घटनास्थळाहून धिंड काढली. (Suspects in Phulenagar firing case procession from area Nashik Crime News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

फुलेनगर भागातील मुंजोबा चौक येथे प्रेम महाले हा आपल्या मित्रासोबत उभा होता, याच वेळी त्या ठिकाणी संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, संदीप आहिरे, जय खरात यांनी त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. हा हल्ला चुकून प्रेम महाले याने घराकडे धाव घेतली. संशयितांनी त्याचा पाठलाग करून महाले याच्या घराच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.

अंगाला गोळी चाटून गेल्याने यात महाले याची आई जखमी झाली होती. त्यांनतर पोलिसांनी तपासाला गती देत घटनेतील संशयित विशाल ऊर्फ विकी विनोद वाघ, जय संतोष खरात, संदीप आहिरे या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर विकी वाघ याच्याकडून एक गावठी पिस्तूलदेखील मिळून आली होते.

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे संशयितांनी सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनतर पोलिसांनी या तिघांची परिसरातून धिंड काढली होती. या वेळी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, निरीक्षक रणजित नलावडे, पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, गुन्हे शोध कर्मचारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT