nashik esakal
नाशिक

नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी संशयितांना पोलिस कोठडी

युनूस शेख

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना (shivsena corporators) नगरसेवक दीपक दातीर, बाळा दराडे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड केली होती. सीसीटीव्ही फुटेज (cctv) तपासल्यानंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात (bhadrakali police station) गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून संशयित फरारी झाले होते.

पुढील तपास गुन्हे शाखा करणार

भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणातील संशयित नगरसेवक दीपक दातीर यांच्यासह पाच शिवसैनिकांना एक दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. शनिवारी (ता. २८) पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी नगरसेवक दीपक दातीर (वय ३१, रा. नवनाथनगर, दातीर मळा, अंबड), नगरसेविकेचे पती योगेश ऊर्फ बाळा दराडे (३३, रा. अश्विननगर, सिडको), नितीन सामोरे (३५, स्वामीनगर, अंबड), योगेश चुंभळे (३४, गौळाणे), किशोर साळवे (२४, नवनाथनगर, अंबड) यांना ताब्यात घेतले. रविवारी (ता. २९) त्यांना विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा, गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे यापुढील तपास गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली.

असाही योगायोग

भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी पोलिस या पाचही जणांचा शोध घेत होते. मात्र ते मिळून आले नाही. शनिवारी (ता. २८) संजय राऊत यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि सायंकाळी पाचही संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याने हा योगायोग म्हणावा, की अन्य काही, अशा चर्चेस शहरात उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT