death news latest marathi news esakal
नाशिक

धावत्या रेल्वेतून उडी मारलेल्या संशयितांचा मृत्यु

नरेश हाळणोर

नाशिक : मनमाड रेल्वेस्टेशन (Railway station) येण्यापूर्वी परराज्यातून अटक करून आलेल्या संशयिताने पोलीस हवालदाराच्या हाताला झटका देत धावत्या रेल्वेतून उडी घेतली.

यात जखमी झालेल्या संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यु (Death) झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे. (Suspects who jumped from moving train dies nashik Latest Marathi News)

तबारक रयनी उर्फ चिन्हे (४०, रा. दरधावा, ललिया, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश) असे मयत संशयिताचे नाव आहे. कांदीवली पोलीस ठाण्याचे सोहन कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबईच्या कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात संशयित तबारक यास कांदिवली पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली होती.

त्यास पुष्पक एक्सप्रेसने घेऊन येत असताना गुरूवारी (ता.२१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मनमाड रेल्वे स्टेशन येण्याच्या काही वेळेआधी संशयित तबारक याने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला. त्यावेळी हवालदार केसरकर यांचया हाताला झटका देत त्याने धावत्या रेल्वेतून बाहेर उडी मारली.

या घटनेत तबारक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यास पोलिसांनी पकडून मनमाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, प्राथमिक उपचार करून त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

त्यानुसार त्यास तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी (ता.२२) मध्यरात्री मृत्यु झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT