police esakal
नाशिक

बलात्काराच्या गुन्‍ह्यातील निलंबित पोलिस निरीक्षक गजाआड

विनोद बेदरकर

नाशिक : देशात सतत महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडत असल्याचं वृत्त समोर येते. मात्र, जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, तेव्हा काय? अशीच एक घटना घडली आहे अहमदनगरमध्ये...अखेर त्या पोलीसाला नाशिकला गजाआड केले आहे. (Suspended-police-inspector-arrested-nashik-marathi-news)

जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, तेव्हा काय?

नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ कार्यरत असताना वादग्रस्त ठरले होते. त्यादरम्यान तेथील उपनगरातील एका महिलेने त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. बलात्काराच्या तक्रारीनंतर संबंधित पीडित महिलेने संशयित वाघ यांच्याकडून धमकावले जात असल्याची दुसरी तक्रार दिली होती. त्यात त्यांना अटकही झाली होती. मात्र, बलात्‍काराच्या गुन्ह्यानंतर ते फरारी झाले होते. नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तपास सुरू होता, त्यात तांत्रिक तपासादरम्यान संशयित वाघ नाशिकला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून नगरचे पथक नाशिकला दाखल झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक हवालदार सय्यद शकील, अविनाश वाकचौरे, सचिन जगताप आदींनी वाघ यांना सापळा रचून जेरबंद केले. यादरम्यान त्यांची नगरच्या पोलिस पथकाशी झटापटही झाली.

नाशिक पोलीसांची कारवाई

नगर येथील तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाशिकला भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन संशयित निलंबित निरीक्षक वाघ यांना अटक केली. त्यांच्याविरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल झाला असून, साधारण तीन महिन्यांपासून ते फरारीच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT