NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Pest Control : पेस्ट कंट्रोल ठेका कार्यारंभ आदेशाला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

NMC Pest Control : शहरात पेस्ट कंट्रोल करण्यासाठी काढण्यात आलेल्या फेरनिविदेत बाद झाल्याने भाजपच्या एका ठेकेदाराने कार्यारंभ आदेश दिलेल्या एसआर पेस्ट कंट्रोलच्या कागदपत्रांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

न्यायालयाने कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र, या स्थगितीमुळे चार वर्षापासून मुदतवाढ घेणाऱ्या ठेकेदाराचे मात्र फावले आहे. (Suspension of nmc Pest Control Contract Commencement Order nashik news)

नाशिक महापालिका हद्दीमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम मागील चार वर्षांपासून मुदतवाढीवर दिले जात आहे. आता उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्थगिती दिल्याने ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये यापूर्वीच्या पेस्ट कंट्रोलचा ठेका संपुष्टात आला. सप्टेंबर २०१९ मध्ये नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला, त्यात १८ कोटींच्या ठेक्याची किंमत ४६ कोटींवर पोचवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.

तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी निविदा प्रक्रिया रद्द केली व फेरनिविदा काढली. मेसर्स दिग्विजय एंटरप्राइजेसने २७ ऑक्टोबर २०२२ ला फेरनिविदेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने महापालिकेच्या फेरनिविदेच्या विरोधात निकाल दिला.

त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यातील अनावश्यक कामांना कात्री लावून ४६ कोटींचा ठेचा ३३ कोटी रुपयांवर आणला. त्यातही सिडको पश्चिम व सातपूर विभागासाठी एक, तर नाशिक रोड पूर्व व पंचवटी विभागासाठी एक असे दोन ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सिडको, सातपूरसाठी एसआर पेस्ट कंट्रोल, तर पूर्व व पंचवटी विभागासाठी दिग्विजय एंटरप्राइजेस पात्र ठरले. निविदेमध्ये भाग घेतलेल्या सूरज एंटरप्राइजेसने एआर पेस्ट कंट्रोलमार्फत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना उच्च न्यायालयात आव्हान दिले.

त्याअनुषंगाने कार्यारंभ आदेश देण्यास न्यायालयाने स्थगिती दिली. ६ जूनला पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान या प्रकरणात लेखा विभागाची भूमिका संशयास्पद आढळून येत आहे. मलेरिया विभागाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन कंपन्यांना पात्र ठरवले.

त्यानंतर लेखा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी नस्ती पाठवली. परंतु, लेखा विभागाने तत्काळ निर्णय न घेता फाइल बाजूला ठेवले. या दरम्यान मिळालेल्या वेळकाढूपणा धोरणाचा लाभ घेत संबंधित ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT