State-of-the-art systems in the air-conditioned Kalyani Poultry Farm by Sanjay Borse. esakal
नाशिक

Nashik News: वातानुकूलित पोल्ट्रीफार्ममधून शाश्‍वत उत्पन्न! शासनाने अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना होणार फायदा

सकाळ वृत्तसेवा

साकोरा (जि. नाशिक) : निसर्गाचा लहरीपणा आणि अपेक्षित न मिळणारा बाजारभाव यामुळे शेती हा अनिश्चितेचा व्यवसाय बनला आहे. यामुळे शेतकरी आता शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसायामध्ये असून यामध्ये असलेले अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत पोल्ट्री व्यवसाय मध्ये शेतकऱ्यांनी आपला पाया भक्कम केला आहे.

आता यातच अद्ययावत असे वातानुकूलित पोल्ट्रीफार्मच्या माध्यमातून शाश्‍वत असे लाखाचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. (Sustainable Income from Air Conditioned Poultry Farm Farmers will benefit if government gives subsidy Nashik News)

महाराष्ट्रात सुमारे नऊ लाख पेक्षा जास्त शेतकरी पोल्ट्री फार्म व्यवसायामध्ये असून शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय प्रगतिपथावर नेला आहे. सर्वसाधारण पोल्ट्री बांधण्यास कमी खर्च येतो.

निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वसाधारण पोल्ट्री मध्ये पक्षांचे वाढ वाढत नाही तसेच पक्षी मरण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. म्हणून आता यावर उपाय म्हणून शेतकऱी अत्याधुनिक पोल्ट्री फार्म उभारण्याकडे वळू लागला आहे. यात वातानुकूलित पोल्ट्रीफार्ममधून शेतकरी महिन्याकाठी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न घेत आहे.

वातानुकूलित दहा हजार पक्षांचा पोल्ट्री फार्म बांधण्यास साठी ६० ते ७० लाख रुपये लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याजवळ भांडवल उपलब्ध होत नाही. म्हणून शासनाने पोल्ट्री व्यवसायासाठी अनुदान उपलब्ध करून दिल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात वातानुकूलित पोल्ट्री फॉर्म बांधून सुजलाम् सुफलाम् होतील.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

वातानुकूलित शेड चे फायदे

खाद्याची नासाडी थांबते

शेडमध्ये दीडपट अधिक पक्षी ठेवणे शक्य .

पक्ष्यांची वाढ होण्याचा कालावधी संरक्षित वातावरणामुळे सुमारे ८ ते १० दिवसांनी कमी

४२ ते ४५ व्या दिवशी मिळणारे आवश्‍यक वजन ३५ व्या दिवशीच

उन्हाळ्यात होणारी पक्ष्यांची मरतूक, संसर्गजन्या आजाराचे धोके कमी

वातानुकूलित पोल्ट्रीमुळे उग्रवासाच्या त्रासापासून सर्वांची सुटका

स्वयंचलित यंत्रणेमुळे पाणी सांडत नसल्याने शेड कोरडे

"माझा वातानुकूलित दहा हजार स्क्वेअर फुटचा पोल्ट्री फार्म आहे. यात १३ हजार पक्ष्यांपासून ३६ व्या दिवशी मला खर्च वजा जाता ३ ते साडेतीन लाख रूपये नफा होतो. खाली गोणी, खत या पासून मिळणाऱ्या पैशातून पक्षांसाठी लागणारे तूस व वैद्यकीय खर्च निघून जातो. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार यांनी वातानुकूलित पोल्ट्री व्यवसायाकडे वळावे व आपले उत्पन्न वाढावे."

- संजय बोरसे, संचालक, कल्याणी पोल्ट्री साकोरा

"माझा वातानुकूलित दहा हजार पक्ष्यांचा पोल्ट्री आहे. वातानुकूलित पोल्ट्रीसाठी शासनाने कर्ज किंवा अनुदान रुपी मदत केल्यास निश्चितच पोल्ट्री व्यवसाय एक अग्रगण्य व्यवसाय म्हणून ओळखला जाईल आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी हक्काचे उत्पन्नाचे साधन मिळेल."

- संदीप सोनवणे, चंद्रभागा पोल्ट्री, सारताळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

IND vs WI, 1st Test Video: ध्रुव जुरेलच्या विकेटकिपिंगने जिंकली मनं! सूर मारत चेंडू आडवत टीकाकारांना दिलं उत्तर

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT