नाशिक : ५१ परदेशी नागरिकांचे स्वॅब; २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह sakal
नाशिक

नाशिक : ५१ परदेशी नागरिकांचे स्वॅब; २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह

ओमिक्रॉन या नव्या विषाणूंमुळे महापालिका सतर्क

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओमिक्रॉन या नव्या विषाणूंमुळे महापालिका सतर्क झाली आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक दाखल होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर अशा नागरिकांची आरटी- पीसीआर चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. दरम्यान, ५१ परदेशी नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यातील २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नाशिककरांची धाकधूक कमी झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रोन हा नवा विषाणू आढळून आला. त्यामुळे देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. राज्य शासनाने नाशिकसह राज्यातील अन्य महापालिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची आरटी- पीसीआर तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरामध्ये गेल्या चार दिवसात ९५ परदेशी नागरिक आले. यातील बहुतांश नागरिक हाय रिस्क असलेल्या सात देशांमधून आल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

त्या अनुषंगाने महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या परदेशी नागरिकांच्या घरी जाऊन स्वॅब घेण्याचे काम सुरू केले आहे. विदेशी नागरिक, तसेच संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक विभागात शोधपथके नियुक्त करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त जाधव यांनी दिल्या. दरम्यान, अशा नागरिकांचा शोध घेताना महापालिकेला मोठी अडचण निर्माण होत आहे. शहरातील पंचतारांकित हॉटेल्स, आलिशान फ्लॅटमध्ये परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याने असे स्थळे शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

निगेटिव्ह अहवालामुळे धोका कमी

गेल्या चार ते पाच दिवसात नाशिक शहरामध्ये ९५ नागरिक परदेशातून आले आहे, अशा नागरिकांची स्वॅब तपासणीचे काम महापालिकेने सुरू केले आहे. ५१ नागरिकांचा शोध घेऊन वैद्यकीय पथकाने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यातील पंचवीस अहवाल निगेटिव्ह आल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला दिलासा मिळाला आहे. तसेच, शहरात धोका कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT