Swami Srikanthanand and citizens present on the occasion of Mamta Kamadi's kanyadan on Sunday. esakal
नाशिक

Nashik News : भावविवश पित्याला आधार; स्वामी श्रीकंठानंद यांनी केले कन्यादान

सकाळ वृत्तसेवा

घोटी (जि. नाशिक) : दुर्गम आदिवासी (Tribal) भागात अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांच्या असहायतेचा फायदा घेणारे देखील कमी नाही. यामुळेच आदिवासी भागात धर्मांतर देखील होतांना आपण पाहत असतो, त्यांचे प्रश्न सोडवणे ही देखील एक भक्ती असून देश सेवा आहे.

(Swami Shri Kanthanand arranged marriage of girl from poor tribal family at his own expense nashik news)

नाशिक जिल्ह्यात विविध पातळीवर काम करतांना गेल्या अनेक वर्षांपासून गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न स्वखर्चाने लावून देत दातृत्वाचा संदेश देणारे जागृत नाशिक-जागृत भारतचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद ह्यांनी आवळखेड येथील आदिवासी समाजातील नामदेव कामडी यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याचे समजताच ममता ह्या त्यांच्या मुलीचे कन्यादान करत लग्नाचा आर्थिक अधिभार उचलला आणि देशभक्ती व सामाजिक संदेश दिला.

मुलीचं लग्न करताना अनेक विधी केले जातात. पण त्यात वडील - मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक विधी असेल तर तो म्हणजे कन्यादान. पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाहसोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत प्रचंड भावनिक होतो.

नामदेव कामडी ह्यांची नाजूक परिस्थिती त्यात पडके घर मुलगी उपवर झाली मात्र आर्थिक मदत वेळेत कोणी करील या भरवश्यावर ते होते. ही गोष्ट शेवटी स्वामी श्रीकंठानंद यांच्या कानावर जाताच त्यांनी कन्यादान करण्यासाठी पुढाकार घेऊन लग्न पार पाडून दिले. परिसरातून या लग्न सोहळ्याचे कौतुक झाले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

यावेळी नामदेव कामडी यांचा परिवार भावविवश होतांना दिसला. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे आज पर्यंत केवळ लग्न लावून स्वामी श्रीकंठानंद थांबत नाहीत.

लग्न लावून दिल्यानंतर संबंधित तरुणींच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी ते आपल्या खाद्यांवर उचलतात. त्यांच्या सर्व गरजा, मुला-मुलींचे शिक्षण, उपचार, कपडे यासाठी आर्थिक पाठबळ पुरविण्याचे काम ते न चूकता संकटकाळात देखील ते अशा जोडप्यांना कायम सहकार्य करत आहेत.

स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने त्यांनी सन्यास घेतला असून ग्रामीण भागातील अनेक समस्या ते मंदिर मठात बसून किंव्हा लोकप्रतिनिधी यांच्या भरवश्यावर सोडवत नाही तर त्यांचा सेवाकार्याची दखल घेणाऱ्या अनेक दानशूर तसेच श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थानच्या माध्यमातून सोडताना दिसतात. यावेळी माजी सैनिक हरीश चौबे, जितेंद्र पाटील, हरीचंद्र भले,शुभम पाटील यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT