NMC News
NMC News  esakal
नाशिक

Nashik : NMCने सोडले 20 लाख रुपयांवर पाणी; जलतरण तलाव सभासदांचे शुल्क माफ

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या पाच जलतरण तलावाचे एकूण २८७२ सभासदांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. कोरोनाकाळात दोन वर्ष जलतरण तलाव बंद असल्याने शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला. (Swimming pool membership fees 20 lakh waived by NMC Nashik Latest Marathi News)

शहरात महानगरपालिकेचे चार जलतरण तलाव आहे. यातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे १७३५, नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात ५७६, सातपूर जलतरण तलाव ४१२, सिडकोच्या स्वामी विवेकानंद जलतरण तलाव येथे १४९ असे एकूण २८७२ आजीव सभासद आहे. या सभासदांकडून वार्षिक प्रतिसभासद ३५० रुपये देखभाल शुल्क घेतले जाते.

२०२०-२१ व २०२१- २२ या दोन आर्थिक वर्षात कोविडमुळे जलतरण तलाव बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, आता जलतरण तलाव नियमित सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन वर्षाचे प्रतिव्यक्ती मिळून ७०० रुपये देखभाल शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यासाठी महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु, कोरोनाकाळात दोन वर्षे जलतरण तलाव बंद असल्याने शुल्क वसूल करणे अयोग्य असल्याची भूमिका मांडण्यात आल्यानंतर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT