Swine Flu update news esakal
नाशिक

Swine Flu Update : धास्ती वाढली; 11 जणांचा मृत्यू

विक्रांत मते

नाशिक : कोरोना संकटाचे पूर्णपणे निर्मूलन होत नाही तोच आता या वर्षी स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा शहरामध्ये ९४ च्या वर पोचला असून, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, असे असले तरी स्वाइन फ्लूमुळे शहरातील मृतांची संख्या अवघी तीन असून, उर्वरित मृत ग्रामीण भागातील आहे. (Swine Flu Update Panic Raises 11 people died Nashik latest marathi news)

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग आजाराचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता कुठे दिलासा मिळत असताना स्वाइन फ्लूच्या आजाराने डोके वर काढले आहे. जून महिन्यापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने आढळत आहे. जून महिन्यात दोन जुलै महिन्यात २८ तर ऑगस्ट महिन्यात ६४ रुग्ण आढळून आले आहे.

स्वाइन फ्लूमुळे उपनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. राजूनगर येथील एका ६५ वर्षी व्यक्ती व राणेनगर मधील आणखी एका महिलेचा असे तीन मृत्यू नाशिक शहरात झाले. जिल्ह्यात स्वाइन फ्लूने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ११ नोंदविण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणमधील मृतांचा यात समावेश आहे. नगर जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यू रुग्ण नाशिकमध्ये खाजगी उपचारासाठी दाखल झाला होता, तर पालघर जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला त्यांचा मृत्यू नाशिक शहरात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर दुरुस्त करुन द्या- मनोज जरांगे

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT