nashik oxygen  esakal
नाशिक

नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरण : ताईओ निप्पॉन, जाधव ट्रेडर्सवर ठपका

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरताना गळती होऊन झालेल्या दुर्घटनेबाबत पुण्यातील ताईओ निप्पॉन व नाशिकच्या जाधव ट्रेडर्स या ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या सूचनेनुसार ताईओ निप्पॉनला २२ लाख, तर जाधव ट्रेडर्सला दोन लाख रुपयांच्या दंडाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. त्यानुसार, या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय विभागासंदर्भात मात्र या अहवालात एकही त्रुटी दर्शविण्यात न आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. गेल्या २१ एप्रिलला घडलेल्या या दुर्घटनेत व्हेंटिलेटरवरील २४ रुग्णांचा वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने तांत्रिक बाबींची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे.

पावसाळी अधिवेशनात तब्बल बारा आमदारांनी तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. ऑक्सिजन प्लांटसारख्या महत्त्वाच्या बाबींची देखभाल करताना ताईओ निप्पॉन कंपनीचे तंत्रज्ञ २४ तास हजर ठेवण्याचा करार करणे गरजेचे होते. त्याशिवाय दुर्घटना घडल्यानंतर २४ तास उलटूनही कंपनीचे प्रतिनिधी हजर झाले नाही. ऑस्किजन पुरवठा, मेन्टेनन्स, नियमित फायर ऑडिट करण्याची जबाबदारी कंपनीची असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गॅस रिफिलिंग करताना कंपनीचे तांत्रिक कर्मचारी उपस्थित नव्हते, आदी मुद्द्यांवर ताईओ कंपनीवर कायदेशीर कारवाई करताना निष्काळजीबद्दल २२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, नाशिकमधील ऑक्सिजन पुरवठादार जाधव ट्रेडर्सला पालिकेच्या रुग्णालयांमध्ये १९ ड्युरा सिलिंडर पुरवण्याचे कंत्राट दिलेले होते. पर्याय म्हणून ऑक्सिजनचे तीन सिलिंडर, ऑक्सिजनचे ३ ड्युरा सिलिंडर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ठेवणे करारानुसार बंधनकारक होते. जाधव ट्रेडर्स कंपनीने ड्युरा सिलिंडर न बदलल्याने वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध झाला नसल्याचे नमूद करण्यात आल्याने त्यांना दोन लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

दुर्घटनेला ताईओ निप्पॉन व जाधव ट्रेडर्स या दोन कंपन्यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्या अनुशंगाने दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT