animal husbandry department esakal
नाशिक

Nashik News : थंडीत घ्या पाळीव जनावरांची काळजी; ZP पशुसवंर्धन विभाग सरसावला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यभरात जनावरांमध्ये आलेल्या लम्पी आजाराने जनावरे दगाविण्याचे प्रमाण वाढत असतानाच शीतलहरी वाढल्याने जनावरांमध्ये आजार वाढविण्याची शक्यता आहे. यासाठी राज्याचा पशुसवंर्धन विभाग सरसावला असून, या विभागाने शीतलहरींच्या परिणामांपासून बचावासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केले आहेत.

यात तूर्तास पशूमेळाव्याचे आयोजन न करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागाने जनावरांची काळजी घेण्याबाबत उपाययोजना राबविण्याचे निर्देश तालुकास्तरावर दिले असल्याची माहिती जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली. (Take care of pets in winter initiative taken by ZP Animal Husbandry Department Nashik News)

राज्यासह नाशिक जिल्ह्यात सध्या शीतलहर आली असून, दिवसाचे तापमान दहा अंशाच्या खाली आले आहे. हवामानात बदल झाला आहे. या बदल्यात हवामानाचा जनावरांवराही परिणाम होण्याचा धोका आहे. शीतलहरींमुळे जनावरांमध्ये हायपोथर्मिया, फ्रास्ट बाईट, भूक मंदावणे, मोठ्या पशुधनात सांधेदुखी, कुत्र्यांच्या पिलात खोकला, श्र्वसनविकार यांसारखे आजार बळविण्याची शक्यता आहे.

या आजारांची लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यक व पॅराव्हेटस पुरेशा संख्येने उपलब्ध करून ठेवावे. पुरेसा औषधसाठा ठेवावा, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुसज्ज ठेवावे, शीतलहरीत पशुधनाचे व्यवस्थापनाबाबत प्रचार व प्रसिद्धी करावी, मृत पशुधनांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जागा निश्चित करावी आदी सूचना केल्या आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

शीतलहरी प्रकोपात हे करा

स्थानिक हवामान अंदाजाची माहिती अद्ययावत ठेवावी, पशुधनाचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी, थंड वाऱ्यापासून बचाव करण्याकरिता त्याचा निवारा चहुबाजूने आच्छदित करावा

, कडाक्याची थंडी असल्यास निवाऱ्यात कृत्रिम प्रकाश व उष्णता पुरविण्याची व्यवस्था करावी, लहान जनावरांना पेंड व गूळ द्यावा, पशुंना जंत व कृमिनाशके देण्यात यावी, पशुधनाच्या संवर्गानुसार लाळ, खुरकत, घटसर्प, फऱ्या पीपीआर, आंत्रविषार रोग प्रतिबंधात्मक लस द्यावी आदी.

शीतलहरीत हे करू नये

शीतलहरीच्या काळात पशुधनास उघड्यावर बांधू नये तसेच मोकाट सोडू नये. पशू मेळाव्याचे आयोजन करू नये. पशुनिवाऱ्यात ओलसरपणा व धूर टाळावा, रात्री पशुधनास अंगणात उघड्यावर बांधणे टाळावे, मृत पशुधनाचा मृतदेह कुरणावर अथवा चारावयाच्या मार्गात टाकू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT