chhagan bhujbal
chhagan bhujbal esakal
नाशिक

संक्रांतीचा सण साजरा करताना आरोग्याची काळजी घ्या - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मकर संक्रांतीचा (Makar Sankrant) सण साजरा करताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.

पारंपरिक मांजाचा वापर करा - भुजबळ

मकर संक्रांतीच्या राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मकर संक्रांतीचा सण म्हटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने पतंग उडवत असतात मात्र आपला सण साजरा करताना इतर कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पतंग उडवताना मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा (Nylon manja) वापर तरुणांकडून होत असतो नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांना तसेच मानवी जीविताला देखील धोका असल्याने नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा होत असतो, मात्र देशभरात कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सण साजरे करत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी देखील आपण घ्यायला हवी. गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, मास्कचा वापर करा, हाथ स्वछ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT