death  esakal
नाशिक

Nashik News: धावत्या रेल्वेतून सेल्फी काढणे बेतली जीवावर; 16 वर्षीय मुलाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : युवा वर्गात मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याची खूप क्रेझ आहे. परंतु सेफ्ली काढताना आपण आपला जीव धोक्यात तर घालत नाही ना, याचेही भान राहत नाही.

अशाच एका घटनेत धावत्या रेल्वेत दरवाजाजवळ मोबाईलमध्ये सेल्फी घेताना तोल गेला आणि १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. (Taking selfie from running train 16 year old boy dies by falling from train nashik news)

सुबोध हरिष पै (१६, रा. महात्मानगर, नाशिक) असे दुर्दैवीरित्या मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना गेल्या मंगळवारी (ता. ३०) दुपारी घडली आहे. सुबोध हा त्याच्या आईसमवेत मंगळवारी मुंबईला रेल्वेने जात होता.

नाशिकरोड रेल्वेस्थानकात मायलेक गरिब रथ एक्सप्रेसमध्ये बसले. त्यानंतर एक्सप्रेसने नाशिकरोड स्टेशन सोडल्यानंतर वेग घेतला होता. तसा, सुबोध यास धावत्या रेल्वेच्या दरवाजाजवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने धावताना लहवित ते अस्वली यादरम्यान असताना, सुबोध हा दारात धोकादायकरित्या उभा राहून सेल्फी घेत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो रेल्वेच्या चाकाखाली सापडून त्याचा दुर्दैवी अंत झाला.

त्याच्या आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. याप्रकरणी लहवित रेल्वे स्टेशनचे मास्तर सुभाष टोंगारे यांच्या खबरीनुसार देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT