bribe 1.jpg 
नाशिक

सातबारा उताऱ्यासाठी लाच घेताना तलाठ्यास अटक; पोलिस ठाण्याच्या बाजूच्याच तलाठी कार्यालयातच घडला प्रकार

प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव  : जागेच्या उताऱ्यावर ‘औद्योगिक वापर’ अशी नोंद करून सातबारा (७/१२) उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडून १७ हजार २५० रुपयांची लाच घेताना नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर तलाठ्याला रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे किल्ला पोलिस ठाण्याच्या इमारतीला लागून असलेल्या शहर तलाठी कार्यालयातच मंगळवारी (ता. २९) दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. लाचखोर तलाठी शरीफ गणी शेख (वय ४९) असे तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदारासमवेत एक साक्षीदारही

तक्रारदाराने तलाठी शेख यांच्याकडे जागेच्या सातबारा उताऱ्यावर ‘औद्योगिक वापर’ अशी नोंद करून उताऱ्याची मागणी केली होती. शेख यांनी टाळाटाळ करीत पैशाची मागणी केल्याने संबंधित तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. पैसे मागणी केले त्या वेळी तक्रारदारासमवेत एक साक्षीदारही होता. अखेर सातबारा उताऱ्यासाठी ठरलेली रक्कम मंगळवारी देण्याचे निश्‍चित झाले.

महसूल विभागात खळबळ

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने व अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण रासकर, मृदुला नाईक, हवालदार कुशारे, मोरे, गोसावी, पोलिस नाईक इंगळे, दाभोळे आदींच्या पथकाने तलाठी कार्यालयानजीक सापळा रचला. तक्रारदार रक्कम देत असताना या पथकाने तलाठी शेख यांना अटक केली. किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून शेख यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT