Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी 20 हजाराची लाच घेणारा रामतीरचा तलाठी चव्हाण ACBच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : वाटणी केलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर (शासकीय महसुल अभिलेखावर) नाव लावण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या आराई (रामतीर, ता. बागलाण) येथील तलाठी चंपालाल सुरेश चव्हाण यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज कऱ्हे (ता.बागलाण) येथे आज शुक्रवार (ता.१५) रोजी रंगेहाथ पकडले.

या कारवाईमुळे तालुक्यातील महसुल विभागात खळबळ उडाली आहे. (Talathi of Ramtir baglan champalal chavan took bribe of twenty thousand to name Satbara caught by ACB Nashik Bribe Crime)

यातील तक्रारदार शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे असलेली शेतजमीन वडिलांनी तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावावर वाटणी करून दिली होती. सदर कागदपत्रे तक्रारदार शेतकऱ्याने शासकीय महसुल अभिलेखावर नाव लावणेकरीता आराई (रामतीर, ता.बागलाण) येथील तलाठी चंपालाल सुरेश चव्हाण यांच्याकडे दिले होते.

नाव लावण्याच्या बदल्यात तलाठी चंपालाल चव्हाण याने तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाने आज शुक्रवारी (ता.१५) रोजी दुपारी सापळा रचला.

तलाठी चंपालाल चव्हाण याने तक्रारदार शेतकऱ्याकडून कऱ्हे (ता.बागलाण) येथे वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठ्यास रंगेहात पकडले.

या कारवाईमुळे बागलाण तालुक्यातील महसुल विभागाच्या गोटात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तलाठी चंपालाल चव्हाण याच्या विराधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात येत आहे.

लाचलुचपत विभागाच्या नाशिक परीक्षेत्र पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असुन पुढील तपास लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव करीत आहे.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालय अथवा कुणी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचेतर्फे कुणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास याबाबत नाशिक परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे तक्रार नोंदवावी. तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT