Kailas Mudliyar & Sambhaji Moruskar
Kailas Mudliyar & Sambhaji Moruskar esakal
नाशिक

Nashik News : नाशिक रोडला बेळगाव- कोल्हापूर युतीची चर्चा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : प्रभाग २० मध्ये भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या गंधर्वनगरी मैदानावर श्री बालाजी संस्कार केंद्र सभामंडप भूमिपूजन समारंभ झाल्यावर आता नाशिक रोडमध्ये बेळगाव- कोल्हापूर युतीची चर्चा घडायला लागली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर आणि बालाजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार यांच्यामध्ये समेट झाल्याची चर्चा सध्या घडत आहे. (Talk of Belgaum Kolhapur Alliance on Nashik Road Nashik News Nashik News)

महाराष्ट्र- बेळगाव सीमावादाचा प्रश्न अजून अनुत्तरीत असला तरी मूळचे बेळगाव येथील असणारे बालाजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार, गिरीश मुदलियार आणि मूळ गाव कोल्हापूरचे असणारे माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांच्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत समेट घडून आल्याचे समारंभाच्या निमित्ताने दिसून आले आहे. संभाजी मोरूस्कर या समारंभाला उपस्थित नसले तरी अप्रत्यक्ष विरोध मावळल्याची चर्चा आहे. पाच वर्षांपूर्वी गंधर्वनगरी येथे बालाजी सोशल फाउंडेशनने बालाजी मंदिर उभे केले होते.

त्यानंतर हे मंदिर अनधिकृत आहे. रस्त्यावर आहे म्हणून हे मंदिर पाडण्यात माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही गिरीश मुदलियार यांचा संभाजी मोरूस्कर यांनी पराभव केला होता. त्याच वेळेस कैलास मुदलियार यांनी ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत पोस्टर झळकविले होते. पाच वर्षानंतर आता पुन्हा त्याच जागेवर बालाजी संस्कार केंद्र सभामंडप भूमिपूजन झाले आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पाच वर्षांपूर्वी मुदलियार यांनी दिलेला नारा या कार्यक्रमात नागरिकांना आठवला आहे. या ठिकाणी दिमाखदार भूमिपूजन अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद महामंत्री मिलिंद परांडे, महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांच्या हस्ते झाले. राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि शत्रू होईल हे कधीच सांगता येत नाही. म्हणून निवडणुकीसाठी का होईना संभाजी मोरूस्कर यांनी शत्रू लिमिटेड ठेवण्यासाठी कैलास मुदलियार यांना जवळ केल्याची चर्चा प्रभागात घडत आहे.

सभामंडपासाठी थेट भाजप आमदारांचा निधी

येथील सभागृह उभारण्यासाठी भाजपच्या आमदारांचा ८८ लाखांचा निधी यासाठी देण्यात येणार आहे. पीडब्ल्यूडी हे बांधकाम करणार असून यासाठी स्वयंसिद्ध हॉल पाडून लहान करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

SCROLL FOR NEXT