A blooming tamarind tree in the field of Bhausaheb Ahire, a farmer from Tembhe. esakal
नाशिक

Nashik News: कमी पावसानंतरही बहरले चिंच वृक्ष! शेतकऱ्यांच्या उंचावल्या अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : चिंच म्हटले, की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट-गोड चिंचेचा वापर चटणी, सॉस बनवण्यासाठी जातो. कसमादे भागामध्ये यंदा कमी पाऊस असला, तरी चिंचेच्या झाडांना बहर आला आहे.

त्यामुळे चांगल्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. (Tamarind tree blossomed even after less rain Raised expectations of farmers Nashik News)

चिंच वापराने खाद्यपदार्थाला वेगळी चव प्राप्त होते. दैनंदिन खाद्यपदार्थात चिंचेचा वापर केल्यास त्याचे आरोग्याला फायदे होतात. चिंचेमधील पौष्टिक घटक हे आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करतात.

लोह, कॅल्शिअम, फायबर, पोटॅशिअम, ‘व्हिटॅमिन सी'-‘ए' असे घटक चिंचेत असतात. शेतकऱ्यांच्या बांधावर व राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेचे वृक्ष बहरले आहेत. ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा चिंचेचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत.

दाट सावली देणाऱ्या या वृक्षाची शेतकरी आवर्जून जोपासना करतात. आगामी काळात बेमोसमी पाऊस, गारपीट, वादळ, वारे आदी नैसर्गिक आपत्ती आली नाही, तर चिंचेचे उत्पन्न हमखास येईल. नैसर्गिक परिस्थितीवर उत्पन्नाची शाश्‍वती आहे.

शंभर वर्ष जगणारा वृक्ष

चिंच ही सदाहरित वनस्पती असून सर्व वृक्षांपेक्षा अधिक दीर्घायुष्य असणारा वृक्ष आहे. साधारणतः शतकापेक्षा अधिक काळ या वृक्षाची आयुर्मान असते. उंची साधारणतः ८० ते १०० फुटापर्यंत असते.

चिंचेचे लाकूड शेतकरी प्रामुख्याने शेती अवजारांसाठी वापरतात. कडक उन्हात चिंचेच्या झाडाची सावली रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दिलासा देते.

चिंचेचे फायदे

० चिंचेमध्ये लोह अधिक प्रमाणात असते. त्यामुळे चिंचेचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो

० ‘व्हिटॅमिन सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते

० हाइड्रोसिट्रिक ॲसीडने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते

० रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करण्यासाठी चिंच फायदेशीर असते

० लोह आणि पोटॅशिअमच्या प्रमाणामुळे रक्तदाब नियमित करण्यासाठी चिंच फायदेशीर आहे

० चिंचेचा वापर हा पाचक रूपात केला जातो. चिंचेच्या सेवनाने पोटाशी संबंधित विकार दूर होतात

(अर्थात, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT