Agriculture Loan esakal
नाशिक

Nashik : खरीप, रब्बी पीक कर्जासाठी 3 हजार 650 कोटीचे उदिष्ट

कुणाल संत

नाशिक : जिल्ह्यात चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये खरीप आणि रब्बी पीक कर्ज (Kharif & Rabbi Crop Loan) वाटपाचे सुमारे ३ हजार ६५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक (District Leading Bank) व्यवस्थापक आर. आर. पाटील यांनी दिली. मागील वर्षी २०२१-२२ मध्ये ३ हजार ५३५ कोटीच्या उद्दिष्टापेक्षा चालू वर्षी सुमारे ११५ कोटींनी पीक कर्ज वाटप वाढीचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. त्यामध्ये खासगी बँकेच्या (Private Banks) कर्जवाटपाच्या उद्दिष्टात ५९ कोटीने वाढ करण्यात आली आहे. (Target of Rs 3650 crore for kharif rabi crop loan Nashik News)

दरवर्षी जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून पीक कर्ज वाटपाची उद्दिष्ट ठरविले जाते. उद्दिष्ट अंतिम झाल्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावरही आढावा होऊन त्यास अंतिम स्वरूप देण्यात येते. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील एकूण दोन लाख ३४ हजार ३३७ खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने एप्रिल २०२२ मध्ये १७ हजार २ खातेदारांना २५३ कोटी १९ लाख रुपये इतके पीक कर्ज वाटप झाले आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी जिल्हा बँकेस १८ कोटी, राष्ट्रीयकृत बँकांना ४५ कोटी, खासगी बँकांना ५२ कोटी रुपयांनी उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे.

रब्बीसाठी ८०३ कोटी

पिककर्जासाठी ठेवण्यात आलेल्या ३ हजार ६५० उद्दिष्टांपैकी यंदाच्या खरिपात २०२२ मध्ये २ हजार ८४७ कोटी आणि रब्बी पिकासाठी ८०३ कोटीचे आहे. गतवर्षी २०२१ मध्ये अनुक्रमे दोन हजार ७८० आणि ७५५ कोटी असे ३ हजार ५३५ कोटी रुपये उद्दिष्ट होते. चालू वर्षीच्या उद्दिष्टात खरिपासाठी ६७ कोटी आणि रब्बीसाठी ४८ कोटी अशी ११५ कोटींनी वाढ करण्यात आली आहे.

२०२२-२३ साठी खरीप व रब्बी पीक कर्ज वाटप उद्दिष्ट

बँकेचे नाव लक्षांक (रक्कम कोटीत)

जिल्हा बँक ५७९ कोटी २३ लाख

राष्ट्रीय बँका २ हजार ४६२ कोटी ६८ लाख

ग्रामीण १० कोटी ३१ लाख

खासगी ५९७ कोटी ७५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT