nmc2.jpg 
नाशिक

एलईडी फिटिंगला विलंबामुळे ‘टाटा’ला डिसेंबरपासून दंड; स्थायी समितीचा निर्णय

विक्रांत मते

नाशिक : शहरात ९२ हजार पथदीपांवर एलईडी फिटिंग बसविताना होणारा विलंब लक्षात घेता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ही मुदतवाढ फक्त नोव्हेंबरअखेरपर्यंत असून, त्यानंतर १ डिसेंबरपासून दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

अवघे ३५ हजार पोलवर फिटिंग

वीजबचतीच्या उद्देशाने शहरातील ९२ हजार पथदीपांवर एलईडी फिटिंग बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सात वेळा निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर मे. टाटा प्रोजेक्टला काम देण्यात आले. २०१९ मध्ये स्थायी समितीने प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर आचारसंहितेमुळे कार्यारंभ आदेश देण्यास विलंब झाला. निवडणुकीनंतर कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर काम सुरू होणे अपेक्षित होते. ऑगस्ट २०१९ ते जून २०२० हा कालावधी एलईडी फिटिंग बसविण्यासाठी निश्‍चित करण्यात आला. परंतु या कालावधीत अवघे ३५ हजार पोलवर फिटिंग बसल्या. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने पुन्हा कामाला विलंब झाला. 

तिसरी मुदतवाढ देताना दंड आकरण्याची सूचना

जूनमध्ये मुदत संपुष्टात आली. जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एलईडी बसविण्याचे नव्याने आदेश देण्यात आले. परंतु अद्यापही काम पूर्ण झाले नाही. स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक कमलेश बोडके यांनी एलईडी बसविण्याचा मुद्दा मांडला. वीज विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी आतापर्यंत १३ टक्के काम अपूर्ण असल्याची माहिती दिली. मुदतीत काम पूर्ण न केल्यास तिसरी मुदतवाढ देताना दंड आकरण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार १ डिसेंबरपासून दंड आकारणीच्या सूचना देण्यात आल्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

अमरावतीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा येतोय मेसेज

Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

SCROLL FOR NEXT