Accidental Car esakal
नाशिक

Nashik News : सिन्नर जवळ तवेरा उलटली; दोघा साई भक्तांचा मृत्यू अन् 7 जखमी

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर देवपूर फाट्याजवळ आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिर्डीहून त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या मुंबईस्थित साई भक्तांच्या तवेरा जीपला अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात भाईंदर व अंबरनाथ येथील दोघांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. (Tavera accident near Sinnar To Sai devotees died and 7 injured nashik Latest Marathi News)

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कल्याण व भाईंदर परिसरातील एकमेकांचे नातेवाईक व मित्र असणारे तरुण मंगळवारी साई दर्शनासाठी शिर्डी येथे मुक्कामी थांबले होते. आज सकाळी त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी जायचे असल्याने ते सिन्नर कडे जात असताना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ तवेरा जीप एमएच ०४ क्युझेड ९२२८ पलटी होऊन अपघात झाला. वेगात असलेली जीप टायर फुटल्याने जवळपास दोनशे फूट फरफटत गेली.

या अपघातात इंद्रदेव दया शंकर मोरया (२५) रा. लोढा पार्क जवळ,भाईंदर पूर्व व सत्येंद्र सुखराज यादव (21) रा. बुवापाडा, अंबरनाथ या दोघांचा गंभीर जखमी झाल्याने अपघात स्थळीच मृत्यू झाला. तर त्रिवेंद्र त्रिपाठी व रोहित मोरया या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. इतर पाच तरुण किरकोळ जखमी झाले. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आले.

अपघात घडल्यानंतर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक प्रकाश गवळी विजय सोनवणे हवालदार सतीश बैरागी, नितीन जगताप, क्रेनचालक किरण पाटील आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT