Teachers Day Teachers are making various demands nashik marathi news 
नाशिक

शिक्षकांना 'या' मागण्यांसाठी शिक्षक दिनीच पाळवा लागणार काळा दिवस; वाचा सविस्तर

पोपट गवांडे

नाशिक/इगतपुरी : पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो पण इगतपुरी तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर हा दिवस काळा दिवस  म्हणून साजारा करण्याची वेळ आली आहे.

निकाली काढण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार इगतपुरी तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन शुक्रवार ( ता.4 रोजी ) तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ता.18 फेब्रुवारी रोजी शिक्षणमंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठक विविध विषयांवर चर्चा होऊन एक महिन्यात महासंघाचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

शिक्षक दिन काळा दिवस

या विषयी अनेक वेळा आंदोलने, वेळोवेळी निवेदने देऊनही अद्यापही कोणतेही आदेश काढले नसल्याने शिक्षक दिनीच काळा दिवस म्हणून पाळावा लागणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.संजय शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रा.वैशाली कोकाटे, प्रा.शिवाजी चव्हाण, प्रा.अरुण वाघ, प्रा.राजेंद्र गायकवाड, प्रा. उल्का सोनवणे, प्रा.डि.ए.गायकवाड उपस्थित होते.

 या आहेत प्रमुख मागण्या 

1) मूल्यांकन पात्र घोषित शाळा वाढीव तुकड्या तथा अघोषीतला निधीसह घोषित करून सर्वांचा निधी वितरणाचा आदेश निर्गमित करावा.
2) दशकाहून अधिक काळ विना वेतन वाढीव पदावर कार्यरत शिक्षकांना पद मंजुरी व वेतन अनुदान द्यावे.
3) गेली 20 वर्षापासुन विनावेतन कार्यरत आय.टी शिक्षकांना त्वरित वेतन अनुदान द्यावे.
4) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षकांवर जुन्या पेन्शनबाबत झालेला अन्याय दूर करावा, तसेच नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
5) राज्य सरकारी कर्मचारी यांचे प्रमाणे 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT