Teacher
Teacher  sakal
नाशिक

Teachers Transfer: आदिवासी क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांची ZPत धडक! धोरणातील त्रुटी दूर करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य शासनाच्या निर्णयानुसार झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत मोठ्याप्रमाणात त्रुटी असल्याने आदिवासी क्षेत्रातील काम केलेल्या शिक्षकांची पुन्हा आदिवासी क्षेत्रात बदली झाली आहे.

या बदली झालेल्या शिक्षकांनी सोमवारी (ता. २०) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन त्रुटी दूर करण्याची मागणी केली. (Teachers transferred to tribal areas strike in ZP demand to rectify policy loopholes nashik news)

जिल्हा परिषद शिक्षक नियुक्ती आदेशामध्ये आदिवासी, तसेच डोंगराळ भागांमध्ये पाच-सात वर्षे सेवा करावी लागेल, असा स्पष्ट उल्लेख असूनही बऱ्याच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या वारंवार अवघड क्षेत्रात होत आहेत. या उलट जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांच्या बदल्या आदेशात नमूद असूनही सुगम क्षेत्रातच होत आहेत.

त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात कधीही सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर या अतिशय डोंगराळ आणि अतिदुर्गम आदिवासी समजल्या जाणाऱ्या भागात सेवा केलेली नाही. नवीन शिक्षक भरती करताना जर प्रामुख्याने या भागात शिक्षकांची नियुक्ती केली असती, तर ही असमानता कदाचित संपुष्टात आली असती.

त्यामुळे यापुढील नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती या भागात प्रामुख्याने करावी व सेवाकाळात आदेशात नमूद असल्याप्रमाणे या अवघड क्षेत्रातील सेवा करणे बंधनकारक करावी. प्रत्येकामध्ये येथे सेवा करण्याची मानसिकता तयार होईल. २०१८ च्या सुगम असलेली गावे २०२२ च्या वेळेस मात्र अवघड क्षेत्रात गणली गेलीत, याचाच अर्थ ती गावे यापूर्वीही अवघडच होती हा सरळसरळ अर्थ होतो.

अशा अवघड क्षेत्रात आदेशात नमूद असलेल्या मुदतीपेक्षाही जास्त वर्षे सेवा करून सुगम क्षेत्रात बदली मिळालेल्या शिक्षकांची नोकरी सुरू तारीख ग्राह्य न धरल्यामुळे सेवाज्येष्ठता ही घसरून पुन्हा अवघडातील अवघड शाळेवर बदलीसाठी जावे लागते आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

बदली राउंड ६ मध्ये शासकीय सेवा आदेश मुद्दा क्रमांक १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांची या अटी-शर्थीला अधीन राहून आजपावेतो आदिवासी व डोंगराळ भागातील सेवा झाली नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्राधान्यक्रमानुसार बदलीपात्र म्हणून समावेश असावा.

यामुळे शासन सेवा आदेशाचे पालन होऊन बदली प्रक्रियेत कुठलीही अडचण येणार नाही व कर्मचाऱ्यास ते मान्यही करावे लागेल. तरी बदली शासननिर्णयातील या व इतरही त्रुटी अभ्यासगटाच्या माध्यमातून दूर कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर, राजेंद्र बाबूराव उगले, विलास जगन्नाथ गवळी, जितेंद्र देवीदास खोर, अनिल भिकजराव माळी, कैलास गवळी, राजेंद्र रूपचंद साळुंखे, संतोष मुक्तानी निरभवणे, विजय वामन पाटील, दादाजी सोमनाथ आहिरे, संदीप बाबूलाल बैरागी, अशोक तुकाराम पवार, प्रवीण ओंकार साबळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT