SAKAL - 2021-03-12T092404.459.jpg 
नाशिक

दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर

सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथे जात होते. पण त्यावेळी अशी एक घटना घडली ज्यामुळे महापालिकेचे कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिका कर्मचाऱ्याचे कुटुंब उध्वस्त

अंबड लिंक रोडवर काही दिवसांपासून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता वळविण्यात आला आहे. एकेरी रस्त्यावर दोन वे करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. १०) रात्री दुचाकी व टाटा ४०७ टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात नाशिक महापालिकेचे कर्मचारी रोहित पवार यांचा पाचवर्षीय मुलगा प्रणय ठार झाला. पवार रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथे जात होते. विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरडार धडक दिली. यात मुलगा प्रणयचा मृत्यू झाला, तर रोहित पवार व पत्नी गंभीर जखमी झाले.

अर्धा तास रास्ता रोको

याबाबत ठेकेदाराने सूचनाफलक न लावल्याने टेम्पो भरधाव चालवत दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित कुटुंबास नुकसानभरपाई देण्यासाठी अर्धा तास रास्ता रोको केला. यामुळे गुरुवारी दुपारी पपया नर्सरी ते दत्तमंदिर रस्ता अर्धा तास बंद होता. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे, निरीक्षक हेमंत नागरे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Gangapur VIP Facility: गंगापूरमध्ये ३.७० कोटींच्या व्हीआयपी विश्रामगृहाचे लोकार्पण; शासकीय निवासस्थानांमुळे अधिकारी मुख्यालयी राहणार

SCROLL FOR NEXT