ten years old boys.jpg 
नाशिक

दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या १० वर्षांच्या मुलांनी तीन शालेय बसच्या काचेची तोडफोड केली. या घटनेमुळे पोलिसांसह पालकांनाही धक्का लागला आहे.. पोलिसांनी या बालकांना समज देत सोडून तर दिले. मात्र विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे पालक, शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागला.

असे घडले सर्व..

गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर परिसरात शालेय मुलांना खेळण्यासाठी मैदान तसेच काही खेळणी आहेत. या खेळण्यांवर खेळण्यासाठी बाहेरील मुलेही येत असतात. सुरक्षारक्षक अशा बाहेरील विद्यार्थ्यांना हटकण्याचे काम सातत्याने करतात. शनिवारी असाच काहीसा प्रकार घडला. शनिवारी जोशी वाडा परिसरातील ९ ते १० वर्षांची मुले शाळेतील खेळण्यांवर, मैदानावर खेळण्यासाठी आली. त्यावेळी शाळेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले.त्यांना घरी जाण्यास बजावत मैदानाबाहेर काढले. याचा राग आल्याने सुरक्षारक्षक किंवा शाळेला अद्दल घडविण्यासाठी या तीनही मुलांनी एकत्र येत शनिवारी अभिनव बालविकास मंदिर गाठले. अंधाराचा फायदा घेत सुरक्षा रक्षकाची नजर चुकवत त्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश केला. आजूबाजूचे दगड उचलत शाळेच्या आवारात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या उभ्या असलेल्या बसगाडय़ांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मुलांच्या या दगडफेकीत शाळेच्या तीन गाडय़ांच्या काचा फुटल्या. आवाजाने सुरक्षारक्षकांसह इतरांनी वाहनतळाकडे धाव घेतल्यावर हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत संशयित पळून गेले.

मुलांचे वय पाहून पोलीसही चक्रावले

सोमवारी (ता.३०) सकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकाराविषयी शालेय व्यवस्थापनाने तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तीनही मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. मुलांनी काच फोडण्याची दिलेली कारणे आणि त्यांचे वय पाहून पोलीसही चक्रावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT