Shiv Sainik present in front of Jayant Dinde while guiding the Shiv Sainiks during the important meeting of Shiv Sainiks in the taluka. esakal
नाशिक

Nashik Political News : दिंडोरीत ठाकरे गटाला गळती; भाऊ चौधरी नंतर सुनील पाटील शिंदे गटात

सकाळ वृत्तसेवा

लखमापुर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांच्याबरोबर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या उपस्थितीत दिंडोरी तालुक्याची ठाकरे गटाची बैठक घेत शिवसेनेची अस्मिता नाही तर महाराष्ट्र वाचविण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले. (Thackeray group leak in Dindori After Bhau Chaudhary Sunil Patil join Shinde group Nashik Political News)

यावेळी मागील काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पदे भोगलेल्या यांनी पक्षाशी गद्दारी केली. निवडणूका आल्या की तिकिटासाठी गर्दी करणारे आज पक्षाच्या बैठकीला पाठ दाखवितात. याला तालुक्यातील शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. त्यावर जयंत दिंडे यांनी शिवसैनिकांना शांत करत जाणाऱ्यांना नक्कीच पश्चात्ताप होईल आणि परत येतील असा विश्‍वास व्यक्त केला.

जे सोबत आहेत, त्यांना घेऊन शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा उभी करू, असे म्हणत गट,तट, रुसवे, फुगवे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना थारा देवू नका अशी मागणी केली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

यावेळी माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, जिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, नाना मोरे, तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, जयराम डोखळे, अ‍ॅड. विलास निरघुडे, उत्तम जाधव, वसंत घडवजे, विश्‍वास गोजरे, रावसाहेब जाधव, प्रभाकर जाधव, विजय पिंगळ, अविनाश वाघ, अरुण गायकवाड, देवेंद्र धात्रक, पुंडलिक अपसुंदे, सुनील मातेरे, किरण कड, माणिकराव उफाडे, नंदु बोंबले, नारायण राजगुरू, मोहन जाधव, संतोष मुरकूटे, सोनू देशमुख, बाळू निसाळ, अमोल देशमुख, दिनकर नाठे, नदीम सय्यद, संगम देशमुख, नीलेश शिंदे, सुनील पवार, राहुल गणोरे, काका निखाडे, भाऊराव शिंदे, पप्पू शिवले, राहुल गणोरे, प्रदिप देशमुख, जगन सताळे, राजेंद्र जाधव, सोनीराम गायकवाड, बबलू मोहिते, राकेश थोरात, सुनील घडवजे, विलास केदार, बबलू भालेराव, कैलास गामणे, संजय ढगे, राजेंद्र गटकळ, बापू सोनवणे, प्रताप देशमुख, प्रकाश जाधव, नीलेश कातोडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदारांची बैठकीला दांडी

दिंडोरीतील महत्त्वपूर्ण बैठकीस माजी आमदार धनराज महाले व माजी आमदार रामदास चारोस्कर अनुपस्थितीत राहिल्यामुळे जयंत दिंडे यांनी त्यांच्या अनुपस्थिती बद्दल नाराजी व्यक्त केली. माजी आमदार यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहायला पाहिजे होते अशी अपेक्षा व्यक्त केली. तर उपस्थित शिवसैनिकांनी जिल्हाध्यक्ष देताना तो जनमानसातील चेहरा असावा व त्याची ओळख संपूर्ण जिल्हाभर असावी अशी मागणी करत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव व माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांच्या नावाची शिफारस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Atpadi Nagaradhyaksh Result: आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

SCROLL FOR NEXT