The rose Valentine Nashik will adorn the markets of Delhi and Mumbai sakal
नाशिक

नाशिकच्या गुलाबाने दिल्ली, मुंबईची बाजारपेठ सजणार

व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘टॉप सिक्रेट’ गुलाबाला देशभरात मागणी

तुषार महाले

नाशिक : फेब्रुवारीचा दुसरा आठवडा प्रेमाचा आठवडा ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या आवडत्या व्यक्तीला तसेच प्रियजनांना प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबपुष्पांची भेट देत एकमेकांचे नाते साजरे करण्याचे हे क्षण. फूल उत्पादनात गुलशनाबाद म्हणून नाशिकची ओळख असून, यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त नाशिकच्या ‘टॉप सिक्रेट’ गुलाबाला देशभर मागणी वाढली आहे.

कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. फुलांचे माहेरघर असलेल्या नाशिकच्या गुलाबाचे उत्पादन पुन्हा बहरले आहे. कोरोनाकाळात गत दोन वर्षापासून फुलांची मागणी कमी झाल्याने गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून नाशिकच्या शेतकरी उत्पादकांकडे मुंबई, दिल्लीतील व्यापाऱ्यांनी मागणी केल्याने गुलाबाला तेजी निर्माण आली आहे.

पांढरा, गुलाबी, पिवळ्या यासह लाल रंगांचे गुलाब प्रसिद्ध आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ ला लाल गुलाबाचे मोठे आकर्षण असते. कर्नाटकातील बेंगळुरूनंतर महाराष्ट्रातील पुणे, नाशिकमधील पॉलिहाऊस फूल शेतीसाठी देशात प्रसिद्ध असून, यातील नाशिकच्या गुलाबाला देशभर मागणी आहे. तपोवन परिसरात वर्षभर गुलाबाचे उत्पादन घेत असलेल्या धीरज जेजूरकर या शेतकऱ्याने वीस गुंठे शेतीत पॉलिहाऊस तयार केले.

''वीस गुंठ्यांतील जागेत वर्षभर गुलाबाचे उत्पादन घेत आहे. लग्नसराईसह सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होत असल्याने यंदा गुलाबाला मागणी वाढली आहे. गुलाबाच्या पॅकिंगला पाच रुपये खर्च येत असून, गुलाबाला चांगला बहर असल्याने दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर यासह देशभरात नाशिकचा गुलाब पाठविला जात आहे.''

- धीरज जेजूरकर, गुलाब उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT