Theft at Country Liquor Shop One and half lakh worth of goods stolen nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : देशी दारूच्या दुकानात चोरी; दीड लाखाचा माल लंपास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील निमोण नाका परिसरात असणाऱ्या सरकारमान्य देशी दारू दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क ४० बॉक्स लांबविले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की या ठिकाणी सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून नेहमीप्रमाणे बंद केल्यानंतर दुकानदार घरी गेला (Theft at Country Liquor Shop One and half lakh worth of goods stolen nashik crime news)

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी देशी दारू दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचे दोन्ही कुलूप तोडून सीसीटीव्ही फिरवून दुकानांमध्ये प्रवेश केला.

दुकानातील प्रिन्स कंपनीचे कंपनीचे १८० मिली दारूअसलेले २७ बॉक्स, ९० मिली दारू असलेले १० बॉक्स, ७५० मिली असलेले २ बॉक्स व बाजीगर कंपनीचे १८० मिली चा १ बॉक्स असा एकंदरीत सर्व दीड लाखाच्या आसपास माल व गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदरचा प्रकार सकाळी दुकानदाराच्या लक्षात येताच त्यांनी ही सर्व हकीगत पोलीस स्टेशनला सांगितली. नांदूर पोलीस स्टेशनचे कदम यांनी येऊन सदरच्या चोरीचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या दुकानातील दारूचे बॉक्स चोरीला गेलेले आहे.

चोरट्यांनी आता देशी दारूचे दुकाने ही लक्ष बनवलेले असून वाढत्या भुरट्या चोरांमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर-ओपीचे कदम करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT