theft esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरट्यांनी देशी दारूकडे वळवला मोर्चा!

सकाळ वृत्तसेवा

नांदूर शिंगोटे : गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नांदुर-शिंगोटे परिसरामध्ये चोरी सत्र थांबण्याचे नाव काही घेईना. लहान मोठ्या चोऱ्यांचे दररोजच घटना या भागांमध्ये समोर येत आहे.

शुक्रवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास निमोण नाका परिसरातील देशी दारूचे दुकानच चोरट्यांनी आता लक्ष केले. या ठिकाणी सरकार मान्य देशी दारू दुकान असून रात्रीच्या सुमारास सदरच्या दुकानावरील कवले काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला व दुकानांमधील चक्क सहा बॉक्स व चिल्लर घेऊन चोरटे पसार झाले.

सदरच्या दुकानातील सहा बॉक्स मधील 288 बॉटल चोरट्यांनी पळविल्या. प्रत्येक बॉटलची किंमत 70 रुपये याप्रमाणे 20 हजार 160 रुपये व गल्ल्यातील रोख रक्कम मिळून 25 हजाराच्या आसपास चोरट्यांनी डल्ला मारला. सदरचा प्रकार या ठिकाणी असणाऱ्या कामगारांनी बघितल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

याबाबत नांदूर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघितले असता पुढील तपास सुरू केला. सदरच्या चोरीमुळे नांदुर-शिंगोटे परिसरामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या चोरट्यांचा शोध लावण्याची आवाहन पोलिसांसमोर पुन्हा उभे राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT