Inspector Nilesh Bodkhe and the farmers are investigating the incident. esakal
नाशिक

Nashik Crime: द्राक्षबागेतील झाडे तोडून शेती साहित्याची चोरी; जोपुळ येथील सरपंच उगले यांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : जोपुळ (ता. दिंडोरी) येथील सरपंच माधवराव उगले यांच्या द्राक्षबागेतील झाडे तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत, शेतातील साठ हजाराचे शेती साहीत्य चोरुन नेल्याची घटना घडली. (Theft of agricultural materials by cutting trees in vineyard Sarpanch Ugle of Jopul suffered great loss Nashik Crime)

सरपंच उगले यांची जोपुळ ते पिंपळगाव रोडवर गट क्रमांक १७१/२मध्ये द्राक्षाची बाग आहे. गेल्या शनिवारी (ता. २०) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी शेतातील द्राक्षबागेवर कुऱ्हाडीने घाव घालून मोठ्या प्रमाणात झाडे तोडली.

तसेच द्राक्षबागेत ठेवलेले अंदाजे २७ हजार पाचशे रूपये किमतीचे पावडर मारण्याचे ब्लोअर मशीनचे आठ पितळी फुले, सूर्या कंपनीचा सुमारे ३२ हजार ५०० रूपये किमतीचा शंभर किलो क्षमतेचा वजन काटा असा मुद्देमाल चोरून नेला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या आठ दिवसांपूर्वीदेखील उगले यांच्या शेतातील द्राक्षबागेतील काही द्राक्षाची झाडे कुऱ्हाडीने तोडून मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. त्यानंतर गेल्या शनिवारी पुन्हा द्राक्षांची ८० झाडे जमिनीपासून चार ते पाच इंचावर तोडून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

उगले यांनी तत्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार वणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी भादंवी कलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. बोडखे यांच्यासह उपनिरीक्षक प्रकाश जाधव, एम. एल. बर्डे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT