crime esakal
नाशिक

Nashik Crime News : सावरकरनगरमध्ये सराफी पेढीवर डल्ला; दुर्लक्षामुळे 25 लाखांचे दागिने चोरीला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोड परिसरातील सावरकरनगर येथील टकले न्यू ज्वेलर्सच्या शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल २५ लाख ७५ हजारांचे सोन्या-चांदीचे व हिऱ्याचे दागिने लांबविले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. (theft on Sarafi Pedhi in Savarkarnagar Jewelery worth 25 lakhs stolen due to negligence Nashik Crime News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

दरम्यान, या सराफी पेढीबाहेर सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नव्हता. तसेच, सिक्युरिटी अलार्मही बंद असल्याने चोरट्यांना सोयीचे झाल्याची बाब समोर आली असून, सीसीटीव्हीचे कॅमेरे उच्च दर्जाचे नसल्याने त्यात संशयितांची अंधूक छबी पोलिसांना मिळाली आहे.

या प्रकरणी अपूर्व रघुराज टकले (रा. मीनाक्षी अपार्टमेंट, माणिकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सावरकरनगरला वेणूनाद अपार्टमेंटमध्ये त्यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. गेल्या सोमवारी (ता. २०) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीसह हिऱ्याचे २५ लाख ७५ हजारांचे दागिने लांबविले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक संजय भिसे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT